गडचिरोली जिल्हयातील अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांकरीता केंद्रवती अर्थसंकल्प योजनेसाठी अर्ज आंमत्रित

गडचिरोली :- एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, गडचिरोली अंतर्गत गडचिरोली जिल्हयातील गडचिरोली, चामोर्शी,धानोरा,आरमोरी,वडसा,कुरखेडा,व कोरची या तालुक्यातील अनुसूचित जमाती करीता उत्पन्न वाढीच्या योजना,प्रशिक्षणाच्या योजना व मानव साधन संपत्ती विकासाच्या व आदिवासी कल्याणात्मक योजना राबविण्यात येत आहेत.अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांकरीता केंद्रवती अर्थसंकल्प योजना अंतर्गत सन 2022-23 मध्ये योजना मंजूर आहेत. करीता ईच्छुक उमेदवारांकडून विहीत नमुण्यात दिनांक 08 फेब्रुवारी 2023 पासून दिनांक 07 मार्च 2023 पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत.अर्ज प्रकल्प कार्यालय गडचिरोली येथे विनामुल्य उपलब्ध आहेत.तरी ईच्छुक लाभार्थ्यांनी संपुर्ण भरलेले अर्ज सर्व आवश्यक कागदपत्रासह (जात प्रमाणपत्र,रहिवासी दाखला,उत्पन्न दाखला,उत्पन्न प्रमाणपत्र,जमिनीचा 7/12,आधार कार्ड,फोटो,गटकरीता नोंदणी प्रमाणपत्र,बँक पास बुक,ईत्यादी ) दिनांक 08 फेब्रुवारी 2023 पासून दिनांक 07 मार्च 2023 पर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करावे.अधिक माहिती करीता प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प,गडचिरोली येथे संपर्क साधावा.असे सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवारी विकास प्रकल्प गडचिरोली,मैनक घोष यांनी कळविले आहे.

@ फाईल फोटो

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

टाकळघाट येथे माता रमाई जयंती उत्साहात

Thu Feb 9 , 2023
संदीप बलविर, प्रतिनिधी चिमुकल्यांच्या नृत्यात श्रोते मंत्रमुग्ध महाप्रज्ञा बुद्ध विहार व डॉ बाबासाहेब आंबेडकर विचारमंचचा उपक्रम टाकळघाट :- महाप्रज्ञा बुद्ध विहार व डॉ बाबासाहेब आंबेडकर विचारमंच,टाकळघाट यांच्या संयुक्त विद्यमाने युगसूर्याची सावली,त्यागमूर्ती रमाबाई आंबेडकर यांची १२५ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. महाप्रज्ञा बुद्ध विहार,टाकळघाट येथे आयोजित या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून पत्रकार संदीप बलविर तर प्रमुख अतिथी म्हणून ग्रा प […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com