युवक काँग्रेस अध्यक्ष कुणाल राऊतांच्या दखलंदाजी एनएसयूआय पदाधिकाऱ्यांची कार्यक्रमाला दांडी

– युवक काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या रोषामुळे अध्यक्ष कुणाल राऊतांची NSUI कडे वाटचाल ?

नागपूर :- राजकीय भेदभाव करत निवडक युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावणारे महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष संघटनेत एकाकी पडले आहे. नोटीस पाठवण्यापूर्वी कुठलीही खात्री न करता कारवाई करण्याचा प्रयत्न केल्याने ते तोंडघशी पडले आहे. संघटनेतील अनेक पदाधिकाऱ्यांनी नोटीस पाठवू नये असा आग्रह धरला असताना द्वेष ठेवून कारवाई करण्याचा प्रयत्न केल्याने विदर्भातील पदाधिकाऱ्यांनी त्यांच्याच कार्यक्रम करण्याचे ठरविले असे दिसते आहे. म्हणून की काय युवक काँग्रेस कुठलाही कार्यक्रम आयोजित करीत नसल्याने त्यांनी NSUI च्या शहरातील कार्यक्रमाला उपस्थिती लावली.

मात्र सदर कार्यक्रमाला कुणाल राऊत येत असल्याचे कळताच, NSUI च्या प्रदेश, शहर तसेच विधानसभा पदाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. या निमित्याने विद्यार्थी काँग्रेसमधील देखील गटबाजी चव्हाट्यावर आली असून NSUI प्रदेश अध्यक्ष आमीर शेख यांनी देखील दांडी मारली. ज्या युवक काँग्रेसच्या अध्यक्षाला स्वतःची युवक काँग्रेस संघटना सुरळीत चालविता येत नाही ते काय विद्यार्थी काँग्रेसला मार्गदर्शन करणार अशी भावना झाल्याने विद्यार्थी काँग्रेसमध्ये नाराजी वाढली.

पक्ष संघटनेचा शिष्टाचाराचे पालन न करता निवडक लोकांना हाताशी धरून युवक काँग्रेस तसेच विद्यार्थी काँग्रेसमध्ये लुडबुड करणाऱ्या कुणाल राऊत विरोधात दोन्ही संघटनांतील पदाधिकाऱ्यांचा प्रचंड रोष असून त्यांनी दिल्लीतील वरिष्ठांकडे तक्रार केल्याची माहिती मिळाली आहे. वरिष्ठांनी देखील थोड थांबा लवकरच कारवाई केली जाणार असल्याचे आश्वासन दिले असल्याची माहिती मिळते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

Maharashtra Governor inaugurates Seminar on Management Accounting

Tue May 7 , 2024
Mumbai :- Maharashtra Governor Ramesh Bais inaugurated a National Seminar organised by the Institute of Cost Accountants of India on the occasion of International Management Accounting Day at Y B Chavan Auditorium in Mumbai on Mon (6 May). The theme of the Seminar was “Navigating the New Frontier: Management Accounting in the Era of Real-Time Insights, Sustainable Growth and Cybersecurity”. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com