उष्णतेपासून सावधानता बाळगण्याचे आवाहन   

यवतमाळ :- जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानात वाढ होत असून उष्णतेमुळे मानवी आरोग्यावर परिणाम होऊ नये याकरीता प्रतिबंधात्मक दक्षता बाळगणे आवश्यक आहे. उष्णतेच्या काळात उष्माघात होऊ नये याकरीता काय करावे व काय करु नये याबाबत मार्गदर्शक सुचना जिल्हा प्रशासनाच्यावतीने निर्गमीत करण्यात आल्या आहे, या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्याता आले आहे.

तिव्र उन्हात मुख्यतः दुपारी १२ ते ३ वाजताच्या दरम्यान नागरिकांनी बाहेर पडणे टाळावे, पुरेसे पाणी पित राहावे, फक्त हलक्या रंगाच्या सुती कपड्यांचा वापर करावा, घराबाहेर पडतांना छत्री, टोपी, गॉगलचा वापर करावा, मद्य, चहा, कॉफी व कार्बोनेटेड शितपेय पिण्याचे टाळावे, शिळे अन्न खाणे टाळावे, उन्हात काम करत असतांना आपला चेहरा व डोके ओल्या कपड्याने झाकावे, शक्यतो दुपारी १२ ते ३ या कालावधीमध्ये उष्ण वातावरणात श्रमाचे काम करणे टाळावे.

चक्कर येत असल्यास किंवा आजारी वाटल्यास त्वरीत डॉक्टरांकडे दाखवावे, भरपूर ओआरएस आणि लस्सी, ताक, लिंबूपाणी यांसारखी घरगुती शीतपेयांचे सेवन करावे, प्राण्यांना सावलीत ठेऊन त्यांना भरपूर पाणी प्यायला द्यावे, नागरिकांनी दुपारी बाहेर जाणे टाळण्यासोबतच गडद, घट्ट व जाड कपडे घालणे टाळावे, बाहेर तापमान अधिक असल्यास शारीरिक श्रमाची कामे टाळावीत.

उष्माघात झालेल्या व्यक्तींची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. अशा व्यक्तीला एखाद्या थंड जागी ठेवावे, शरीराचे तापमान खाली आणण्याचे प्रयत्न करावे, उष्मघात झाल्यास ओल्या कपड्याने बाधित व्यक्तींचे अंग थंड पाण्याने पुसून काढावे, व्यक्तीला ओआरएस व लस्सी, ताक, लिंबूपाणी इत्यादी घरगुती शितपेय द्यावे तसेच ताबडतोब जवळच्या आरोग्य केंद्रात किंवा हॉस्पीटल मध्ये दाखल करुन उपचार सुरु करावे, असे आपत्ती व्यवस्थापन विभागाच्यावतीने कळविण्यात आले आहे.

@ फाईल फोटो
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

भागवत में श्री कृष्ण ने रचाया महारास

Tue May 7 , 2024
नागपुर :- रास जीव का शिव के मिलन की कथा है। यह काम को बढ़ाने की नहीं काम पर विजय प्राप्त करने की कथा है। भगवान की अनेक लीलाओं में श्रेष्ठतम लीला रास लीला का वर्णन करते हुए डॉ. संजय कृष्ण सलिल महाराज ने वर्धमान नगर के राधा कृष्ण मन्दिर में भक्तों से कहे। कथा के मुख्य यजमान नारायण रौनक […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com