युनिक फ्रोजन फुड कॉर्पोरेशनमध्ये विनापरवाना आईस्क्रीम विक्री

नागपूर :  अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006 अंतर्गत अन्न पदार्थाची खरेदी, विक्री, वितरण, उत्पादन करीत असतांना रितसर परवाना घेणे बंधनकारक आहे. याकरीता अन्न व औषध प्रशासनातर्फे वेळोवेळी अन्न व्यवसायिकांमध्ये परवाना शिबिराचे आयोजन करुन जनजागृती करण्यात येते. परंतु काही अन्न व्यवसायिक विना परवाना आईस्क्रीमची विक्रीसाठी साठवणुक करतात.

मे.युनिक फ्रोजन फुड कॉर्पोरेशन यांच्याकडे तपासणी केली असता Blue Bunny ब्रँडचे Medium Fat Icecream, Icecream Mango Bar, Medium Fat Frozen Desert (Kaju Anjeer) and Medium Fat Frozen Desert (Mango N Cream) हे अन्न पदार्थ विना परवाना आईस्क्रीमची विक्री होत असल्याचे आढळून आले. अन्न पदार्थाचे नमुने विश्लेषणाकरीता घेऊन उर्वरित सर्व साठा एकूण वजन 153.95 किलो व एकूण किंमत 61 हजार 600 चा साठा विना परवाना विक्री करीत असल्याचे आढळून आले.

अन्न व्यवसायिकांनी विनापरवाना अन्न पदार्थाची खरेदी, विक्री, वितरण, वाहतूक व उत्पादन करु नये, तसे आढळल्यास अन्न सुरक्षा व मानदे कायद्यांतर्गत 6 महिने कैद व रु. 5 लाखापर्यंत दंड आकारण्यात येतो. प्रत्येक अन्न व्यवसायिकांनी रितसर परवाना, नोंदणी घेऊनच अन्न व्यवसाय करण्याचे आवाहन अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त श्री. अन्नपुरे यांनी केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

गुरुवारी मनपा केन्द्रांमध्ये कोव्हीशिल्ड उपलब्ध

Thu Dec 2 , 2021
नागपूर :  राज्य शासनाकडून कोव्हीशिल्ड लसीच्या पर्याप्त पुरवठा प्राप्त झाल्यामुळे १८ वर्षांवरील व ४५ वर्षावरील वयोगटातील सर्व नागरिकांचे लसीकरण नागपूर महानगरपालिकेसह शासकीय केन्द्रावर गुरुवारी २ डिसेंबर रोजी सकाळी १० ते संध्याकाळी ५ पर्यंत होणार आहे. या वयोगटातील नागरिकांना कोव्हिशिल्ड लस नि:शुल्क दिली जाईल. मनपा तर्फे नागरिकांना मोठया प्रमाणात लसीकरण करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. नागरिकांना प्रथम डोज, दूसरा डोज घेण्यासाठी लस पुरेश्या प्रमाणात उपलब्ध आहे.             लसीकरणसाठी ऑनलाईन आणि […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com