मोर्शी तालुक्यातील २३ गावात पाणी पुरवठा योजनेच्या ४८ कोटीच्या कामाला मंजुरी !

– आमदार देवेंद्र भुयार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याची फलश्रुती ! 

– २३ गावातील नागरिकांनी मानले आमदार देवेंद्र भुयार यांचे आभार ! 

मोर्शी :- मोर्शी तालुक्यातील नागरिकांची पिण्याच्या पाण्याची समस्या निकाली काढण्यासाठी तालुक्यातील नागरिकांसाठी पांढरा हत्ती ठरलेल्या ७० गाव पाणी पुरवठा योजनेला तोडून नव्याने मोर्शी तालुक्यातील २३ गावातील पाणी पुरवठा योजना मुबलक जलपूर्ती करण्याचा दृष्टीकोन बाळगून आमदार देवेंद्र भुयार यांनी २३ गाव पाणी पुरवठा ४८ कोटी २१ लाख ४१ हजार ८५९ रुपयांच्या योजनेचे काम कोणत्याही परिस्थितीत पूर्णत्वास आणण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्नांची मालिकाच राबविली. दरम्यान शासनाकडे वारंवार मुद्दा उपस्थित करून योजना मंजूर करण्याबाबत शासनाने कार्यवाही करण्यासह यातील तांत्रिक अडचणी सुद्धा दूर करण्यासंदर्भात शासनाचे लक्ष वेधले होते. याची फलश्रुती म्हणुन आता मोर्शी तालुक्यातील २३ गाव पाणी पुरवठा योजनेच्या कामांकरिता ४८ कोटी २१ लाख ४१ हजार ८५९ रुपयांची मान्यता प्रदान केली आहे. त्यामुळे आता लवकरच योजनेच्या कामांना सुरुवात होण्याचा मार्ग अधिक प्रशस्त झाला आहे. या बद्दल आमदार देवेंद्र भुयार यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांचे आभार मानले आहे.

आमदार देवेंद्र भुयार यांनी मोर्शी तालुक्यातील २३ गावातील पानी पुरवठा योजना मंजूर करण्यासाठी मौजा चारघड व २३ गांवे, येथील नळ पाणी पुरवठा योजनेस मंजूरी देण्यासाठीचा प्रस्ताव मुख्य अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, अमरावती यांना निर्देश देऊन शासनाच्या मान्यतेकरीता सादर करण्याच्या सूचना दिल्यामुळे. प्रस्तुत नळ पाणी पुरवठा योजनेच्या प्रस्तावास मुख्य अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, अमरावती यांनी दि. १४.०७.२०२२ अन्वये तांत्रीक मान्यता प्रदान केली तसेच सदस्य सचिव, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, मुंबई यांच्या अध्यक्षतेखाली तांत्रिक छाननी उपसमितीच्या दिनांक दि.१०.०६.२०२२ रोजीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आलेली आहे. मौजा चारघड व आष्टोली, तरोडा (धानोरा), दाभेरी, विष्णोरा, धानोरा, डोमक, आष्टगांव, बऱ्हाणपूर, खेड, भिवकुंडी, तरोडा, ब्राम्हणवाडा, चिखल सावंगी, वऱ्हा, अर्धमाणी, अंबाडा, चिंचोली गवळी, खानापुर, दहसुर, गणेशपुर, पिंपरी, उदखेड, सायवाडा, या २३ गावांना प्रादेशिक पाणी पुरवठा योजना नळ पाणी पुरवठा योजनेच्या ४८ कोटी २१ लाख ४१ हजार ८५९ रुपये इतक्या किंमतीच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्यात आल्याची माहिती आमदार देवेंद्र भुयार यांनी यावेळी दिली.

मोर्शी तालुक्यातील नागरिकांची तहान भागविण्यासाठी आमदार देवेंद्र भुयार यांनी तालुक्यातील नागरिकांना दिलेला शब्द पाळला आहे. त्यासाठी त्यांनी चारगड धरणावरून २३ गाव पाणी पुरवठा योजने करीता ४८ कोटी रुपयांचा निधी मिळवून दिला असून ही योजना लवकरच कार्यान्वित होणार आहे. या योजनेच्या माध्यमातून मोर्शी तालुक्यातील २३ गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी सुटणार असल्यामुळे २३ गावातील नागरिकांनी आमदार देवेंद्र भुयार यांचे आभार मानले.

– मोर्शी वरूड तालुका हा ड्राय झोनमध्ये असल्यामुळे येथील पाण्याची पातळी खोल गेली असल्यामुळे २३ गावातील पाणी टंचाई समस्या कायम स्वरुपी निकाली काढण्यासाठी मोर्शी तालुक्यातील ४८ कोटी रुपयांची २३ गाव पाणी पुरवठा योजना चारगड धरणावरून मंजूर करून घेतली मोर्शी तालुक्यात पाणी टंचाई बाबत येत आलेल्या समस्याचे निराकरण करण्याकरिता पाणी टंचाई भविष्यात निर्माण होऊ नये याकरीता मी पुढाकार घेतला असून प्रत्येक वर्षी अधिग्रहनाच्या भरवशावर न बसता कायमस्वरूपी सोर्स निर्माण करणे गरजेचे असून मोर्शी तालुक्यातील उर्वरित टंचाईग्रस्त असलेल्या १३ गावांचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला असून त्यास मंजुरी प्रदान करून कायमस्वरूपी सोर्स निर्माण करण्याचा माझा प्रयत्न आहे

– आमदार देवेंद्र भुयार

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

बालविवाह केल्यास खावी लागेल जेलची हवा

Tue May 7 , 2024
यवतमाळ :- अक्षय तृतीया हा लग्न सोहळ्याकरीता साडेतीन मुहूर्तापैकी एक असल्यामुळे जास्तीत जास्त विवाह या मुहूर्तावर होतात. त्यामुळे या मुहूर्तावर बालविवाह सुद्धा होतात. या मुहूर्तावर बालविवाह केल्यास अशा विवाहात सहभागी सर्व व्यक्तींना जेलची हवा खावी लागू शकते. त्यामुळे अशे विवाह करू नये आणि त्यात सहभाग नोंदवी नये, असे आवाहन करण्यात आले आहे. एखादा लग्न सोहळा पुर्णत्वास नेण्यासाठी लग्न पत्रिका छापणारे, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com