वीज ग्राहक ‘गो-ग्रीन’ झाले अन् बिलात पैसे वाचवले!

नागपूर :- महावितरणच्या नागपूर प्रादेशिक कार्यालयांतर्गत असलेल्या संपूर्ण विदर्भातील 57 हजार 852 ग्राहकांनी वीजबिलांसाठी छापील कागदाचा वापर पूर्णपणे बंद करून केवळ ‘ई-मेल’ व ‘एसएमएस’चा पर्याय निवडून महावितरणच्या पर्यावरणपुरक ‘गो-ग्रीन’ योजनेला प्रतिसाद दिला आहे. या योजनेनुसार छापील वीज बिलाच्या कागदा ऐवजी फक्त ‘ई-मेल’ व ‘एसएमएस’चा पर्याय निवडल्यास वीजग्राहकांना प्रतिबिलात दहा रुपयांची सवलत देण्यात येत आहे. त्यामुळे योजनेत सहभागी ग्राहकांची वीजबिलांमध्ये वार्षिक 120 रुपयांची बचत आहे.

महावितरणच्या संगणकीय प्रणालीद्वारे वीजबिल तयार झाल्यानंतर लगेचच ते ‘गो-ग्रीन’ योजनेतील ग्राहकांना ‘ई-मेल’द्वारे पाठविण्यात येत आहे. ‘एसएमएस’द्वारे वीजबिलाची माहिती देण्यात येत आहे. यासोबतच ग्राहकांना प्रॉम्ट पेमेंटचा लाभ घेऊन हे वीजबिल ऑनलाईनद्वारे भरण्याची सोय देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे.

गो ग्रीन योजनेत विदर्भात नागपूरकर आघाडीवर

नागपूर परिमंडलातील 20 हजार 408 ग्राहकांनी गो ग्रीन योजनेत आपला सहभाग नोंदविला असून यात नागपूर शहर मंडलातील 14 हजार 171, नागपूर ग्रामीण मंडलातील 3 हजार 201 ग्राहक गो ग्रीन योजनेत सहभागी झाले आहेत. तर वर्धा मंडलामध्ये 3 हजार 36 ग्राहकांनी वीजबिलासाठी छापील कागदाऐवजी ‘ई-मेल’ व ‘एसएमएस’ला पसंती देत पर्यावरणपुरक पर्याय स्विकारला आहे. त्याखालोखाल अकोला परिमंडलातील 14 हजार 218, अमरावती परिमंडलातील 12 हजार 758, चंद्रपूर परिमंडलातील 5 हजार तर गोंदिया परिमंडलातील 5 हजार 4 ग्राहकांनी कागदविरहीत असलेल हा पर्याय स्विकारला आहे.

योजनेत सहभागी होण्याचे आवाहन

‘गो-ग्रीन’ योजनेत सहभागी झालेल्या वीजग्राहकांना छापील वीजबिलांची गरज भासल्यास त्यांना ई-मेलद्वारे प्राप्त झालेले दरमहा वीजबिल संगणकात सॉफ्ट कॉपी मध्ये जतन करून ठेवता येईल. सोबतच महावितरणच्या www.mahadiscom.in या अधिकृत संकेतस्थळावर चालू वीजबिलासह मागील 11 महिन्यांचे असे एकूण 12 महिन्यांचे वीजबिले मूळ स्वरूपात उपलब्ध आहेत. ‘गो-ग्रीन’ योजना ही काळाची गरज असून जास्तीत जास्त वीजग्राहकांनी कागदविरहित वीजबिलांसाठी या योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. ई ऑफीस प्रणालीमध्ये प्रत्यक्ष कागदाचा वापर न करता माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून पेपरलेस कामावर भर आहे. वीज ग्राहकांनी गो ग्रीनच्या सवलतीचा लाभ घेतला तर छापील बिले कमी होऊन कागदाचा वापर कमी होईल व पेपरलेस कामाला चालना मिळेल तसेच पर्यावरणाचे रक्षण होईल.

 बिलाच्या रंगीत प्रिंटची ही सोय

वीज ग्राहकांना छापील वीजबिलांची गरज भासल्यास त्यांना ई-मेल द्वारे प्राप्त झालेले दर महिन्याचे वीज बिल संगणकात सॉफ्ट कॉपी मध्ये जतन करून ठेवता येईल. सोबतच महावितरणच्या संकेतस्थळावर चालू महिन्याचे वीज बिल मूळ स्वरुपात उपलब्ध असते. आवश्यकतेप्रमाणे वीज ग्राहकांना ते डाऊनलोड करण्याची किंवा मूळ स्वरूपात रंगीत प्रिंट घेण्याची सोय आहे.

असे होता येईल योजनेत सहभागी

महावितरणच्या ‘गो-ग्रीन’ योजनेचा पर्याय निवडण्यासाठी ग्राहकांनी वीज बिलावर छापलेल्या जीजीएन (GGN) या 15 अंकी क्रमांकाची नोंदणी महावितरणच्या मोबाईल अ‍ॅपद्वारे किंवा महावितरणच्या संकेतस्थळाच्या https://pro.mahadiscom.in/Go-Green/gogreen.jsp लिंकवर जाऊन करावी. याबाबतची अधिक माहिती www.mahadiscom.in संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली असल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले.

उपमुख्य जनसंपर्क अधिकारी,

महावितरण, नागपूर

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

भंदत आर्य नागार्जुन सुरई ससाई यांनी स्मारक समितीचे अध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा - भदंत आनंद महाथेरो यांची मागणी

Tue May 7 , 2024
नागपूर :- पवित्र दिक्षाभूमी येथुन बौध्द धम्माचा प्रचार प्रसारचे कार्य होणे अपेक्षित आहे व बुध्दाचा वैज्ञानिक धम्म दिक्षाभूमीहून संपूर्ण जगात पसरावा असे डॉ. बाबासाहेबाचे स्वप्न होते परंतु तसे होतांना दिसून येत नाही. याला कारणीभूत दिक्षाभूमी स्मारक समितिचे अध्यक्ष भन्ते आर्य नागार्जुन सुरेई ससाई आहेत. त्यांच्या आरचरणामुळे बौध्द समाजात चुकीचा संदेश जातो बौध्द धम्मात अंधश्रध्देला थारा नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरानी ज्या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com