वारेगाव ग्रामपंचायत च्या वतीने संत शिरोमणी गोरोबाकाका यांना अभिवादन

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- तालुक्यातील वारेगाव ग्रामपंचायत च्या वतीने संत शिरोमणी गोरोबा काका यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले वारेगाव येथील श्री संत शिरोमणी गोरोबाकाका यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला नागपूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुरेश भोयर यांचे हस्ते पुष्प माला अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी कामठी पंचायत समितीच्या सभापती दिशा चनकापुरे, वारेगाव ग्रामपंचायत च्या सरपंच रत्नाबाई उईके, उपसरपंच कमलाकर बागरे, माजी उपसरपंच राजेश मेश्राम ,ग्रामपंचायत सदस्य मंगला युवनाते ,शेवंता रामटेके, शांताबाई मेश्राम, हभप अजबराव उईके महाराज उपस्थित होते. यावेळी जय हनुमान भजन मंडळ वारेगाव ,संत गोरोबाकाका महिला भजन मंडळ वारेगाव यांनी भजन स्वराच्या माध्यमातून अभिवादन केले कार्यक्रमात मार्गदर्शन करताना माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेश भोयर म्हणाले वारेगाव येथील तरुणांनी श्री संत शिरोमणी गोरोबाकाका यांचा आदर्श ठेवून समाज कार्य करण्याचे आवाहन केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक हभप अजाबराव उईके महाराज यांनी केले संचालन उपसरपंच कमलाकर बांगरे यांनी केले व आभार प्रदर्शन माजी उपसरपंच राजेश मेश्राम यांनी मांनले कार्यक्रमाला दुर्गा चौधरी, वसंता गोडाळे ,रामू धुर्वे, सुनिता चांदुरकर, रामराव बोंद्रे, रामू युवनाते, सोनू पाठक ,संदीप बोरसरे ,चुडामन खरवडे ,दीपक पाठक, आशा शिरसागर ,माया पाठक, जय पाठक, गोपी बोलकी, शंकर बोरसरे, ज्ञानबा भलावे ,धनराज गोडाळे, शंकर भुते ,काना भलावी सह मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली हजारो भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

रनाळा येथे प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना आढावा बैठक संपन्न

Tue May 7 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- रनाळा येथे कामठी मौदा विधानसभेचे प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना ची महत्वपूर्ण आढावा बैठक प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेचे जिल्हा संयोजक किशोर कुंभारे यांच्या अध्यक्षते खाली घेण्यात आली. याप्रसंगी प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनचे सहसंयोजक ‌अंगद जांगडे, सुरेश शाहु , रनाळा ग्रामपंचायतचे सरपंच पंकज साबळे ,ग्रामपंचायत सदस्य प्रदीप सपाटे ,स्वप्निल फुकटे, सी.एस.सी. सेंटर च्या संचालीका  जयश्री श्रावणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com