शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागपूरच्या वतीने छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिराचे आयोजन संपन्न

महाराष्ट्र शासन अंतर्गत युवाशक्ती करिअर शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद 

नागपूर :- रेशीमबाग येथे सुरेशभट सभागृहात सोमवारी 15 मे रोजी, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था श्रद्धानंद पेठ दीक्षाभूमी जवळील यांच्या वतीने छत्रपती शाहू महाराज युवा शक्ती करिअर शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दहावी व बारावी चे दोन ते अडीच हजार विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. यावेळी करिअर शिबिराच्या आयोजित कार्यक्रमात दक्षिण नागपूरचे आमदार मोहन मते यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मुख्य अतिथी पाहुणे म्हणून विधान परिषदेचे सदस्य अभिजीत वंजारी (आमदार) यांची प्रामुख्याने उपस्थित होती. या कार्यक्रमात निमंत्रित पाहुणे म्हणून अभय डायगव्हाणे, तंत्रनिकेतन पुरुषोत्तम देवतळे, सहसंचालक प्रमोद ठाकरे, उपसंचालक खेमलाल चांदेकर उपप्राचार्य, यांची सुद्धा उपस्थिती होती. या शिबिरामध्ये मार्गदर्शक म्हणून विद्यार्थ्यांच्या समोर सुरेंद्र गोळे, हरीश राठी, योगेश्वर राऊत, राजभूषण श्रीवास, अभय देशमुख, यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या विषयांवर मोलाचे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र शासन अंतर्गत औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागपूरच्या वतीने करण्यात आले असून संचालन देशकर यांनी केले तर साहेबराव गुडदे यांनी आभार मानले. यावेळी सर्व गटनिदेशक, निदेशक व तासिका निदेशक या सर्वांनी मिळून कार्य केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जयंत टालाटुले, शिवानी ढुमणे, दिलीप मस्की, संजय मस्के, चंद्रकांत गोतमारे, नितीन ठाकरे, संतोष क्रिष्णापूरकर, सुरेन्द दुबे,सिद्धार्थ मेहेरे, सहदेव चव्हाण आणि वाढई सरांनी यांनी परिश्रम घेतलेत.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

एसटीचे अचानक ‘एअर लॉक’

Tue May 16 , 2023
नागपूर :-नरखेडला जाणार्‍या एसटी बसचे अचानक एअरलॉक झाल्याने इंजिनमधून डिझेलचा पुरवठा बंद झाला आणि बस बंद पडली. प्रवाशांना उतरवून दुसर्‍या बसने रवाना करण्यात आले. ही घटना सोमवार 15 मे रोजी सायंकाळच्या सुमारास सीताबर्डी पोलिसठाण्याजवळ घडली. वर्दळीचा मार्ग असल्याने काही वेळ वाहतुकीची कोंडी झाली आणि वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. दरम्यान, वाढत्या तापमानामुळे एअर लॉक झाल्याचे उपमहाव्यवस्थापक श्रीकांत गभणे यांनी सांगितले. एमएच-40-एक्यू […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com