कामठी तहसील कार्यालयात शासनाची ‘फर्स्ट इन एंड फर्स्ट आऊट’प्रणाली लागू

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- महा-ई-केंद्रावर आवश्यक असणारे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी ऑनलाइन प्रक्रिया केल्यास तात्काळ प्रमाणपत्र प्राप्त होत असे आता मात्र या प्रणालीत महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोगाकडून बदल केल्यामुळे महसूल विभागाच्या एफआयएफओ प्रणालीमुळे जात प्रमाणपत्र, नॉनक्रिमिलिअर,अधिवास प्रमाणपत्र व इतर प्रमाणपत्र मिळवायचे असल्यास महाऑनलाईन च्या लॉगिंगला अर्ज प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून विहित कालावधीमध्ये दाखले मिळतील त्यानुसार कामठी तहसील कार्यालयात शासनाची ‘फर्स्ट इन अँड फर्स्ट आऊट’ही प्रणाली लागू करण्यात आली आहे अशी माहिती तहसीलदार अक्षय पोयाम यांनी प्रस्तुत प्रतिनिधींशी बोलताना दिली.

महाऑनलाईन प्रणाली अंतर्गत प्रतिज्ञापत्र ,उत्पन्न दाखला, जात प्रमाणपत्र ,अधिवास प्रमाणपत्र ,नॉनक्रिमिलिअर प्रमाणपत्र सादर केल्यावर प्रमाणपत्र मिळविण्याकरिता नवीन नियमानुसार ‘फर्स्ट इन-फर्स्ट आऊट’या प्रणाली अंतर्गत सर्व अर्ज प्रथमिकतेनुसार पास केल्या जाणार आहे.ज्यांनी फॉर्म भरताना वैद्यकीय सिलेक्ट केले आहे ते अर्ज डीसलॉगिंगमध्ये प्रथम दिसतील त्यानंतर इतर अर्ज दिसतील.पहिला अर्ज पूर्ण होत नाही तोपर्यंत इतर अर्जाची प्रक्रिया होणार नाही.आपण केलेल्या अर्जाच्या अगोदर जे अर्ज सादर झाले असतील ते अर्ज प्राथमिकतेनुसार पूर्ण झाल्या नंतरच क्रमवारीनुसार अर्जाची प्रक्रिया पूर्ण होणार आहे.शासनाच्या या नवीन प्रणालीमुळे दहावी व बारावीच्या पालकांना शैक्षणिक कामासाठी प्रमाणपत्र आवश्यक असतील तर त्याकरिता आधीच ही प्रक्रिया करणे आवश्यक आहे अन्यथा वेळेवर धावपळ करून काहीच साध्य होणार नाही.

-तहसीलदार अक्षय पोयाम

—-महाई सेवा केंद्रावरून अर्ज केला की आवश्यक ते प्रमाणपत्र नियमाप्रमाणे दिल्या जात असे आता मात्र नव्या प्रणालीअंतर्गत जोपर्यंत आधी नोंदणी केलेल्या अर्जाची प्रक्रिया होत नाही तो पर्यंत दुसऱ्या अर्जदारास प्रमाणपत्र प्राप्त होऊ शकत नाही या नव्या प्रणालीत तशी तरतूद करण्यात आल्याने कुठल्याही दलाल वा कुठल्याही कर्मचाऱ्यांचा हस्तक्षेप चालणार नाही त्यामुळे कामे पारदर्शक होतील .प्रमाणपत्राची आवश्यकता असल्यास वेळेवरची धावपळ टाळत आधीच नोंद करीत प्रमाणपत्र मिळविणे सोयीचे होईल तसेच महा ई केंद्रावर शासनाच्या फर्स्ट इन फर्स्ट आऊट या नवीन प्रणाली अंतर्गत प्रमाणपत्र दिल्या जाणार आहे.या दाखल्यावर बारकोडची नोंद होणार आहे बाहेर कुणी अर्जंट दाखला देत असेल तर त्यांना बळी पडू नका, सावध व्हा !

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

सावनेर पोलीसांकडून अवैध सुगंधी तंबाखुची वाहतुक करणाऱ्यावर कारवाई ; एकूण 6.60 लाखाचा मुद्देमाल जप्त..

Tue Jun 13 , 2023
सावनेर –  राज्यात सुगंधी तंबाखूवर बंदी आहे. तरी मोठ्या प्रमाणात हा तंबाखू चोरीच्या मार्गाने येतो. त्याची विक्री मोठ्या प्रमाणात होत असून अवैध विक्री व वाहतूक करणाऱ्या वर  पोलीस अधीक्षक  व अपर पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण यांनी समुळ उच्चाटन करणेबाबत आदेश दिले आहेत त्याप्रमाणे त्यांचे व उपविभागीय पोलीस अधिकारी सावनेर विभाग सावनेर अतिरीक्त कार्यभार उपविभागीय पोलीस अधिकारी काटोल विभाग बापू रोहम […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com