पालघरचे खासदार डॉ.राजेंद्र गावित यांचा भाजपात प्रवेश

– प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले स्वागत

मुंबई :- पालघरचे विद्यमान खासदार डॉ.राजेंद्र गावित यांनी मंगळवारी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमाला मुंबई भाजपा सरचिटणीस संजय उपाध्याय, प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, प्रदेश सहमुख्य प्रवक्ते आशीष देशमुख, माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन आदी उपस्थित होते. प्रदेशाध्यक्ष श्री.बावनकुळे यांनी खा.गावित यांचे भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत केले.

खा.गावित यांचे स्वागत करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, आमदार, खासदार आणि आदिवासी विकास मंत्री असा राजकारणातील मोठा अनुभव गाठीशी असणा-या राजेंद्र गावित यांचा एका अर्थी भाजपा मध्ये पुनर्प्रवेश झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संमतीनेच गावित यांचा भाजपा प्रवेश झाला आहे. खा.गावित यांच्या अनुभवाचा फायदा दिल्लीपेक्षा राज्यात अधिक होणार आहे. या दृष्टीने त्यांच्या संमतीनेच पालघरमध्ये भाजपाने लोकसभा निवडणुकीसाठी हेमंत सवरा यांना उमेदवारी दिली आहे. खा.गावित यांच्या कार्यकर्तृत्वाचा यथोचित सन्मान राखला जाईल असेही फडणवीस यांनी नमूद केले .

खा.गावित यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आपला पूर्ण विश्वास आहे. फडणवीस हे राजकारणात दिलेला शब्द पाळणारे नेते आहेत. यापुढे भाजपा नेतृत्व जी जबाबदारी सोपवेल ती प्रामाणिकपणे पार पाडेन, असेही खा.गावित यांनी सांगितले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील अकरा मतदारसंघात दुपारी १ वाजेपर्यंत सरासरी ३१.५५ टक्के मतदान

Tue May 7 , 2024
मुंबई :- राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान आज दि. ७ मे २०२४ रोजी सकाळी ७.०० वा. पासून सुरु झाले आहे. तिसऱ्या टप्प्यातील एकूण अकरा मतदार संघात दुपारी १ वाजेपर्यंत सरासरी ३१.५५ टक्के मतदान झाले आहे. तिसऱ्या टप्प्यातील एकूण ११ लोकसभा मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे : लातूर – ३२.७१ टक्के सांगली – २९.६५ टक्के बारामती – २७.५५ टक्के हातकणंगले – […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com