श्री दिगंबर जैन युवक मंडळाचे वर-वधू परिचय मेळावा २५ डिसेंबर ला

नागपूर :-स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या शुभ मुहूर्तावर, श्री दिगंबर जैन युवक मंडळ (सैतवाल) आणि महिला शाखा आयोजित 11 व्या, भव्य अखिल भारतीय युवक-युवक परिचय संमेलनाचे आयोजन येत्या रविवारी 25 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 8:00 वाजता. कविवर्य सुरेशभट्ट सभागृह रेशीमबाग येथे होणार आहे. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष राजेंद्र नखाते, स्वागताध्यक्ष प्रा.डॉ.शुभांगी कुकेकर, उद्घाटक देवेंद्र कुमार जैन मुंबई, प्रमुख पाहुणे सुभाष कुकेकर, नितीन नखाते, संजय जैन, विशेष अतिथी महेंद्र पेंढारी, यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. ११ व्या परिचय संमेलनात सहभागी तरुण -तरुणींच्या माहितीसाठी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सुमंगल पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात येत आहे. या कार्यक्रमात सकल जैन समाज या सहयोगी संस्थेचे विश्वस्त व पदाधिकारीही उपस्थित राहतील. संस्थेचे अध्यक्ष विनय सावळकर व कार्यवाह प्रशांत भुसारी यांनी माहिती दिली. या परिचय मेळाव्यात आतापर्यंत 400 अर्ज ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने स्वीकारण्यात आले असून, सतत 35 वर्षे सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या अग्रेसर या संस्थेने आयोजित केलेल्या जैन समाजासाठी परिचय संमेलनाचा लाभ घ्यावा. संस्थेचे मिडीया प्रसिद्धी प्रमुख राजेश जैन यांनी संपूर्ण माहिती दिली असून समाजातील सर्व बंधू-भगिनींनी या कार्यक्रमात जास्तीत जास्त मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन विनय सावळकर यांनी केले

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

आदिवासी उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी येत्या फेब्रुवारीत ‘ट्रायबल इंडस्ट्रियल पार्क’- उद्योगमंत्री उदय सामंत

Thu Dec 22 , 2022
नागपूर :- विदर्भाला भरभरून नैसर्गिक साधन संपत्ती लाभली आहे. उद्योगासाठी येथे पोषक वातावरण आहे. स्थानिक आदिवासी उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘ट्रायबल इंडस्ट्रीयल पार्क’ येत्या फेब्रुवारी महिन्यात कार्यान्वित करीत आहोत. उद्योगपूरक वातावरणाला चालना देत राज्यशासन उद्योजकांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहे, अशी ग्वाही उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आज विदर्भ विकास परिषदेत दिली.    महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अॅग्रीकल्चर व महाराष्ट्र […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com