गोंदियात टिप्परने दिली ट्रँक्टरला धडक….

अमरदिप बडगे
-भीषण अपघातात दोन जणांचा मृत्यू चार जण गंभीर जखमी…
संतप्त नागरीकांनी जाळला ट्रक…
-सायंकाळीं मृतदेह घेउन गावकरी पोहचले दवनीवाडा पोलिस स्टेशनला

गोंदिया :- गोंदिया जिल्ह्याच्या महालगाव मुर्दाडा येथे अवैधरीत्या वाळू तस्करी करणारा टिप्पर ट्रॅक्टर यात विचित्र अपघात झाला आहे. अनियंत्रित टिप्परने मागेउन ट्रॅक्टर ला धडक दिली ट्रॅक्टर टीप्पर खाली घुसल्याने ट्रॅक्टरचा ड्रायव्हर जागिच ठार झाला तर उर्वरित पाच जणांना गंभीर जखमी झाले. असुन त्यांना रूग्णालयात हलवण्यात आले होते. मात्र त्या पैकी एकाचा आणखी मृत्यू झाल्यानें मृत्कांचा आकडा 2 वर पोहचला आहे. अपघात होताच गावकऱ्यांनी टीप्परला पेटवून दिला होता. मात्र महसुल प्रशासनाच्या बेजबाबदार पणा मुळे जिल्ह्यात वाळूची अवैध चोरी होत असून या मुळे अनेक अपघात घडत आहे. त्यामुळे आधी अवैध वाळू बंद करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी म्हणुन नागरिकांनी मृतदेह दवनीवाडा पोलिस स्टेशनला आणले असून जो पर्यंत मृत्कानाच्या कुठुंबाना आर्थिक मदत दिली जात नाही तो पर्यंत मृतदेह उचलणार नाही अशी भूमिका गावकऱ्यांनी घेतली आहे. तर या घटनेनंतर परिसरात तणावाची स्थिती निर्माण झाली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

शिरपूर शेतकरी सहकारी साखर कारखाना सुरु करण्यास शासन सकारात्मक - सहकार मंत्री बाळासाहेब पाटील

Thu Jun 16 , 2022
 मुंबई : शिरपूर शेतकरी सहकारी साखर कारखाना लि. शिवाजीनगर दहीवद, ता. शिरपूर जि. धुळे हा कारखाना सरफेसी (सेक्युरायझेशन ॲक्ट) नुसार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने ताब्यात घेऊन भाडेतत्वाने सुरु करण्यासाठी शासन सकारात्मक असल्याचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.             शिरपूर शेतकरी सहकारी साखर कारखाना सुरु करणेबाबत आज सहकार मंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते.             या बैठकीस साखर आयुक्त शेखर […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
Verified by MonsterInsights