Home » Marathi News

Category: Marathi News

Post
पटसंख्या कमी असलेल्या शाळ्याचे अस्तित्व धोक्यात

पटसंख्या कमी असलेल्या शाळ्याचे अस्तित्व धोक्यात

अमरदिप बडगे, प्रतिनिधी  जिल्हा परिषदेच्या ९८ शाळा मध्ये एकच शिक्षक! ;९८ शाळेत २० पेक्षा हि कमी विद्यार्थी गोंदिया :-  गोंदिया जिल्ह्यातील ९८ शाळे मध्ये २० पेक्षा कमी पट संख्या असुन त्यांना शिकविण्यासाठी एकच शिक्षकांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती समोर आल्याने कमी पट संख्या शाळांची मान्यता रद्द होणार, कि काय अशा प्रश्न आता पालकांच्या समोर निर्माण...

Post
विजयादशमी निमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा

विजयादशमी निमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा

मुंबई :- राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी विजयादशमीनिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. विजयादशमीचा सण दुष्प्रवृत्ती वरील सतप्रवृत्तीच्या विजयाचे प्रतीक आहे. सत्याचा नेहमीच विजय होतो, हा संदेश या सणाच्या माध्यमातून अधोरेखित होतो. यंदाची विजयादशमी सर्वांच्या जीवनात आनंद, सुख, आरोग्य व भरभराट घेऊन येवो या अपेक्षेसह सर्वांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा देतो, असे राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

Post
मतदार ओळखपत्र आधारकार्डशी जोडण्यास सहकार्य करा – उपायुक्त अशोक गराटे

मतदार ओळखपत्र आधारकार्डशी जोडण्यास सहकार्य करा – उपायुक्त अशोक गराटे

चंद्रपूर :- मतदार ओळख पत्रासोबत आधार कार्ड जोडणी ही पुर्णपणे ऐच्छिक असुन महानगरपालिका क्षेत्रात सर्वांचे मतदार ओळखपत्र आधार कार्ड सोबत जोडणी करण्यास सहकार्य करण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिका उपायुक्त अशोक गराटे यांनी ४ ऑक्टोबर रोजी मनपा राणी हिराई सभागृहात आयोजीत सभेत केले. १ ऑगस्ट २०२२ ते ३१ मार्च २०२३ पर्यंत राबविण्यात येणाऱ्या मतदार ओळखपत्र आधारकार्डशी जोडणे...

Post
स्वित्झर्लंड येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय रोबोटिक स्पर्धेत मुंबईतील 5 विद्यार्थ्यांचा सहभाग

स्वित्झर्लंड येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय रोबोटिक स्पर्धेत मुंबईतील 5 विद्यार्थ्यांचा सहभाग

कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिल्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा मुंबई :- जिनेव्हा (स्वित्झर्लंड) येथे येत्या 13 ते 16 ऑक्टोबर दरम्यान होणाऱ्या ‘फर्स्ट ग्लोबल चॅलेंज’ ह्या आंतरराष्ट्रीय रोबोटिक स्पर्धेसाठी मुंबईतील 5 विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. या विद्यार्थ्यांनी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांची मंत्रालयात भेट घेतली. मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धेसाठी शुभेच्छा...

Post
ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था आणखी बळकट करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था आणखी बळकट करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

आयुष्मान भारत हेल्थ कार्डचे वितरण मुंबई :- ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज ‘आयुष्मान भारत हेल्थ कार्ड’चे वितरण करण्यात आले. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात झालेल्या या कार्यक्रमाला आरोग्य मंत्री...

Post
३८ आरोग्य शिबिरांद्वारे ३४२५ महिलांची आरोग्य तपासणी  “माता सुरक्षित तर घर सुरक्षित” अभियान

३८ आरोग्य शिबिरांद्वारे ३४२५ महिलांची आरोग्य तपासणी “माता सुरक्षित तर घर सुरक्षित” अभियान

चंद्रपूर :- “माता सुरक्षित तर घर सुरक्षित” अभियान अंतर्गत ३४२५ महिलांची तपासणी आरोग्य शिबिरांत करण्यात आली असुन मनपा आरोग्य विभागाद्वारे सातत्याने आरोग्य शिबिरांचे आयोजन केले जात आहे. महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत नवरात्र उत्सवानिमित्त ” माता सुरक्षित तर घर सुरक्षित ” अभियान दि. २६ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर पर्यंत राबविले जात असुन याअंतर्गत चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे...

Post
लोकसहभागातून राबविणार अंगणवाडी दत्तक धोरण

लोकसहभागातून राबविणार अंगणवाडी दत्तक धोरण

सामाजिक उत्तरदायित्व निधी देणाऱ्या औद्योगिक आणि स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घ्यावा – महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा मुंबई :- राज्यात लोकसहभागातून अंगणवाडी दत्तक धोरण राबविण्यात येणार आहे. यासाठी सामाजिक उत्तरदायित्व निधी देणाऱ्या औद्योगिक आणि स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केले. अंगणवाडी दत्तक धोरण राबविण्याबाबत मंत्रालयात बैठक...

Post
कोल्हापूरचा शाही दसरा महोत्सव शासनाच्या माध्यमातून  जागतिक पातळीवर पोहोचवणार – मंत्री दीपक केसरकर

कोल्हापूरचा शाही दसरा महोत्सव शासनाच्या माध्यमातून जागतिक पातळीवर पोहोचवणार – मंत्री दीपक केसरकर

मुंबई :-  कोल्हापूरच्या दसरा महोत्सवाला छत्रपती शिवाजी महाराजांची शाही परंपरा आहे. हा महोत्सव जगभरात पोहोचावा, या उद्देशाने यावर्षी शासकीय सहभागातून अधिक भव्य आयोजन करण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न आहे. हा सोहळा संपूर्ण जगासमोर यावा यासाठी महाराष्ट्र शासनाने या सोहळ्याला राज्य महोत्सवाचा दर्जा दिला असून पुढील वर्षीपासून विविध माध्यमातून एक कोटी रूपये निधी उपलब्ध करून देण्याचा मानस...

Post
महिलांनी स्वतः च्या आरोग्याची काळजी घ्यावी : डॉ. विनिता जैन  

महिलांनी स्वतः च्या आरोग्याची काळजी घ्यावी : डॉ. विनिता जैन  

 इंदिरा गांधी रुग्णालयात मोफत आरोग्य शिबीर नागपूर :-  नवरात्रीचे औचित्य साधून सोमवारी इंदिरा गांधी रुग्णालय, गांधीनगर, म.न.पा.नागपूर येथे इंदिरा गांधी रुग्णालय आणि तेलंगखेडी नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. शिबीरात १८ वर्षावरील स्त्रीयांची आरोग्य तपासणी करण्यात आली. शिबिरात उपस्थित तज्ज्ञांकडून महिलांची कर्करोग, दंतरोग, सोनोग्राफी, मॅग्नोग्राफी, रक्त...

WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!