अजनीत अवैध दुकानदारांवर आरपीएफची कारवाई

नागपूर :-अजनी येथील रेल्वेच्या जागेवर अवैध पद्धतीने दुकाने चालविणार्‍यांवर आरपीएफ पथकाने कारवाई केली. रविवारी सकाळच्या सुमारास एकूण सहा जणांवर कारवाई करून गुन्हा नोंदविण्यात आला.

अजनी पूल जडवाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. तसेच अरुंद असल्याने वाहतुकीची कोंडी व्हायची. या मार्गावर वाहनांच्या रांगा लागायच्या. नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागायचा. नागरिकांची या त्रासातून सोडवणूक करण्यासाठी अजनी ते मेडिकल चौकापर्यंत पुलाचे बांधकाम रेल्वे हाती घेतले आहे. तत्पूर्वी अजनी परिसरात असलेल्या दुकानदारांना दुकाने रिकामी करण्यासाठी नोटीसही बजावण्यात आली होती. ही जागा मोकळी करून देण्याची जबाबदारी रेल्वेची होती. त्यामुळे रेल्वेच्या आरपीएफ पथकाने कारवाई केली. पुन्हा दुकाने सुरू करण्यात आल्याने अजनीचे आरपीएफ निरीक्षक हरिमोहन निरंजन यांच्या नेतृत्वात एएसआय एस. के. पवार, एन. एस. चव्हाण आणि पी. सी. पवार यांच्या पथकाने आज सकाळी सहा दुकानदारांवर कलम 144 अंतर्गत कारवाई केली व गुन्हा नोंदविला.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com