
नागपूर :- नागपूर शहर (जिल्हा) कॉग्रेस कमिटीचे अंतर्गत महासचिव व प्रवक्तापदी नियुक्ती करण्यात आली आहे. झा यांच्या नियुक्तीबद्दल हार्दिक अभिनंदन अ.भा.काँग्रेस कमिटीचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. मल्लिकार्जुन खरगे तथा सोनियाजी गांधी व खा.राहूल गांधी यांच्या नेतृत्वात पक्ष संघटनेला बळकट करण्यासाठी आणि पक्षाने दिलेल्या आदेशानुसार व सर्व सामान्य जनतेपर्यंत कार्यक्रम पोहचविण्यासाठी प्रामाणिकपणे कार्य करणार अशी ग्वाही यावेळी दिली. अभिजित झाँ यांच्या भविष्यातील पुढील वाटचाली करीता शुभेच्छा देऊन यांच्या नियुक्ती बद्दल सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यां द्वारा अभिनंदनचा वर्षाव होत आहे. नागपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विकास ठाकरे यांच्या शुभ हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. आणि पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.


