टेकाडी येथे अखंड हरिनाम सप्ताह थाटात संपन्न

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

– पालखी, अखंड भजनासह विविध धार्मिक कार्यक्रमाने अखंड हरिनाम सप्ताह संपन्न

कन्हान :- श्री हनुमान मंदीर टेकाडी ला श्रीराम नवमी ते श्री हनुमान जयंती अखंड हरिनाम सप्ताह पालखी, भजनासह विविध धार्मिक कार्यक्रमाने थाटात साजरा करण्यात आला.

बुधवार (दि१६) एप्रिल ला श्रीराम नवमी च्या पूर्वसंध्येला हनुमान मंदिर टेकाडी येथे विधिवत पूजा अर्चना करुन पालखी यात्रा काढण्यात आली. पालखी यात्रा संपुर्ण गाव भ्रमण करुन यात्रेचे मंदिरात समापन करण्यात आले.

यावेळी मोठ्या संख्येने गावकरी नागरिक सहभागी झाले होते. त्यानंतर दिनांक १७ ते २४ एप्रिल पर्यंत दररोज २४×७ खडा पहारा अखंड भजन करित बुधवार (दि.२४) एप्रिल दुपारी २ वाजता मोठ या उत्साहाने दहीहंडी फोडुन गोपालकाल्याचे प्रसाद वितरण करून सायंकाळी ६ वाजता पासुन पंचकोशितील गावक-यानी भव्य महाप्रसादाचा लाभ घेतला.

सात दिवस अखंड हरिनाम सप्ताहाने श्रीराम नवमी आणि श्री हनुमान जयंती उत्सव मोठ्या उत्साहाने थाटात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वि तेकरिता टेकाडी हनुमान मंदिर पंचकमेटी सह गावक ऱ्यांनी बहुसंख्येने उपस्थित राहुन परिश्रम घेऊन सहकार्य केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

अनुसूचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यातर्गंत प्रलंबित गुन्हयांचा तात्काळ तपास करा - विजयलक्ष्मी बिदरी

Thu Apr 25 , 2024
· विभागीय दक्षता व सनियत्रंण समितीची बैठक · समितीच्या बैठका नियमीत घेण्याच्या सुचना नागपूर :- अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमातंर्गत घडलेल्या प्रत्येक घटनेची नोंद घेवून त्यानुसार तात्काळ तपास पूर्ण करण्याला प्राधान्य देण्यात यावे. विभागात विविध स्तरावरील पिडीत व्यक्तीला तात्काळ मदत देण्याच्या सुचना विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी आज दिल्या. विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय दक्षता व नियत्रंण समितीची […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com