श्री हनुमान मंदिर कांद्री येथे श्री हनुमान जयंती थाटात साजरी

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कन्हान :- श्री हनुमान मंदिर देवस्थान खदान रोड कांद्री येथे श्री हनुमान जयंती निमित्य श्री हनुमान मंदिर देवस्थान सेवा समिती आणि गांधी चौक मित्र परिवार व्दारे पुजा अर्चना, दहीकाला व महाप्रसाद करून श्री हनुमान जयंती साजरी करण्यात आली.

मंगळवार (दि.२३) एप्रिल २०२४ ला सकाळी ९ वाजता श्री हनुमान मंदिर देवस्थान खदान रोड कांद्री येथे कवडु आखरे यांचे हस्ते दहीहंडी फोडुन दहीकाल्याचा प्रसाद वितरण करण्यांत आला.

याप्रसंगी प्रामुख्यानें महेंद्रपाल पलिये, वासुदेव आखरे, झिबल सरोदे, राजेश पोटभरे, सेवक गायकवाड, रामा हिवरकर, बंटी आखरे, सुरेश प्रजापती, मनोज कश्यप, नरेश देशमुख, सुरेश उमक, प्रविन हिंगे, अनिल पोटभरे सह गांधी चौक मित्र परिवाराचे सदस्य उपस्थित होते. तदंतर मालती वांढरे, सुनिता हिवरकर, ऊषा वंजारी, डाहारे, वाडीभस्मे, सुमित्रा, इंदिरा, मंगला, इंदु सह महिलानी दुपारी सुंदरकांड सादर केले. सायंकाळी परिसरातील भावि कांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. कार्यक्रमाच्या यश स्वितेकरिता श्री हनुमान मंदिर देवस्थान सेवा समिती आणि गांधी चौक मित्र परिवाराच्या भाविकांनी सह कार्य केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

वाघधरे वाडी येथील विधृत वाहिनीच्या तीन खांबाची तार व एक लोंखडी खांब चोरी

Thu Apr 25 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कन्हान :- महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीची लघु दाब वाहिनी च्या तीन खांबा वरील विधृत तार व एक लोखंडी खांब कोणीतरी अज्ञात व्यक्तीने वाघधरे वाड़ी कन्हान येथुन चोरुन नेल्याने फिर्यादी च्या तक्रारीवरून कन्हान पोलीसानी चोरीचा गुन्हा नोंद करून पुढील तपास करित आहे. बुधवार (दि.२४) एप्रिल २०२४ ला सकाळी अंदाजे ६.३० ते ८.३० वाजता दरम्यान वाघधरे वाडी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com