नवीन खाजगी दुचाकी वाहनांसाठी आकर्षक नोंदणी क्रमांक उपलब्ध

नवी मुंबई :- पनवेलच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये नवीन खाजगी दुचाकी वाहनांसाठी MH46 CS या नवीन मालिका लवकरच सुरु होत असल्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी पनवेल यांनी कळविले आहे.

या मालिकेतील आकर्षक/अनाकर्षक नोंदणी क्रमांक राखीव करायचे असल्यास नागरिकांनी कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी 10.00 ते दुपारी 2.00 या वेळेत पनवेलच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयात संपर्क साधावा.

महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र मोटार वाहन नियम 1989 च्या नियम 57अ नुसार विहित केलेले आकर्षक नोंदणी क्रमांक व त्यासाठीचे शुल्क याबाबतची सविस्तर माहिती, पनवेल प्रादेशिक परिवहन कार्यालयचे प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्याकडे उपलब्ध आहे. एकाच नोंदणी क्रमांकासाठी एकापेक्षा जास्त अर्जदारांनी अर्ज केल्यास उक्त नमूद तरतूदीनुसार नोंदणी क्रमांकासाठी जाहीर लिलाव केला जाईल, याची नोंद घेण्यात यावी. असे पनवेलचे प्रादेशिक परिवहन अधिकारी,यांनी पनवेल कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील उरण, पनवेल, कर्जत व खालापूर तालुक्यातील नागरिकांना एका प्रसिध्दी पत्रकान्वये आवाहन केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांची' ‘दिलखुलास’ कार्यक्रमात मुलाखत

Fri Apr 26 , 2024
मुंबई :- माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी किशोर तावडे यांची लोकसभा सार्वत्रिक निवडणूक -2024 सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासन सज्ज या विषयावर मुलाखत घेण्यात आली आहे. ही मुलाखत दिनांक २७ एप्रिल 2024 रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरुन तसेच न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवरुन सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित करण्यात येणार आहे. लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने सिंधुदुर्ग […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com