हद्दपार ईसमास घातक शस्त्रासह अटक

नागपूर :- गुन्हेशाखा युनिट क. १ चे अधिकारी व अंमलदार हे गुन्हेगाराचे शोधात पेट्रोलींग करीत असतांना, त्यांनी मिळालेल्या माहीतीवरून पोलीस ठाणे प्रताप नगर, हद्दीत गणेश कॉलोनी जवळील मैदान, पाण्याचे टाकी जवळ, सार्वजनिक ठिकाणी रेड कारवाई केली असता, आरोपी राकेश रमेश गदिवार, वय ३७ वर्षे, रा. श्यामनगर झोपडपट्टी, प्रतापनगर, नागपुर हा हातात एक लोखंडी कोयता घेवुन धुमधाम करताना दिसुन आला. त्यास ताब्यात घेवून त्याचे हातातील कोयता किंमती अंदाजे २००/- रु. चा जप्त केला. आरोपीचा अभिलेख तपासला असता, आरोपीला मा. पोलीस उप आयुक्त परि क. १ यांनी हद्दपार आदेश क्रमांक १४/२०२२ दिनांक १७.०७.२०२२ अन्वये ०२ वर्षाकरीता नागपुर शहरातुन हद्द‌पार केले असल्याचे दिसुन आले.

आरोपी हा हद्दपार असतांना सुध्दा घटनास्थळी कोणतातरी दखलपात्र गुन्हा करण्याचे उ‌द्देशाने शस्त्रासह समक्ष मिळुन आल्याने तसेच, त्याने मा. सह पोलीस आयुक्त, नागपुर शहर यांचे शस्त्र मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याने, पोलीस ठाणे प्रतापनगर येथे आरोपीविरूध्द कलम ४/२५ भा.ह.का., सहकलम १३५, १४२ म.पो.का. अन्वये गुन्हा दाखल करून, आरोपीस अटक केली आहे. पुढील तपास सुरू आहे. वरील कामगिरी मा. पोलीस उप आयुक्त (डिटेक्शन), सहा पोलीस आयुक्त (गुन्हेशाखा) यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखा युनिट क. १ चे अधिकारी व अंमलदार यांनी केली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

चोरीच्या प्रयत्नातील आरोपीस अटक

Thu Apr 25 , 2024
नागपूर :- पोलीस ठाणे सिताबर्डी हरीत, जयहिंद बेकरी, गायत्री अपार्टमेंट, टेम्पल बाजार, नागपुर येथे राहणारे फिर्यादी बिशेश्वर भगोलीराम शाहु, बय ५५ वर्षे हे वेकरीचे बाहेर झोपले असताना त्यांना आवाज आल्याने फिर्यादी है झोपेतुन उठले तेव्हा तेथे पेट्रोलींग करणारे सिताबर्डी पोलीसांचे पथक समोर दिसले. त्यांनी एका ईसमास पकडले होते. नमुद ईसमाने बेकरीचे दरवाज्याला आरीचे सहाव्याने छिद्र केले होते. त्या ईसमाचे हातात […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com