घरफोडी करणाऱ्या आरोपीविरूध्द गुन्हा दाखल

नागपूर :- पोलीस ठाणे नंदनवन हद्दीत, प्लॉट नं. २५, सहकार नगर, विनायक हार्डवेअर मागे, खरबी रोड, नंदनवन, नागपुर येथे राहणारे फिर्यादी नामे कमलाकर श्रीराम पेशने, वय ६४ वर्षे हे त्यांचे घराला कुलूप लावुन परीवारासह यवतमाळ येथे लग्नाचे कार्यक्रमाकरीता गेले असता, कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीचे घराचे मुख्य दाराचे कड़ी-कोंडा, कुलुप तोडुन, घराचे आत प्रवेश करून, घरातील लोखंडी आलमारीतील सोन्याचे दागिने व रोख ६,०००/- रू. असा एकुण २,३९,०००/-रू. चा मुद्देमाल चोरून नेला.

याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे नंदनवन येथे पोउपनि, गुजर यांनी अज्ञात आरोपीविरूध्द कलम ४५४, ४५७, ३८० भा.द.वि. अन्वये गुन्हा दाखल करून, आरोपीचा शोध घेत आहेत. पुढील तपास सुरू आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

जिल्ह्यात मनाई आदेश लागू 

Thu Apr 25 , 2024
नागपूर :- जिल्हयात ग्रामीण भागात सार्वजनिक शांतता आणि सार्वजनिक सुरक्षितता राखण्यासाठी अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रितेश महाजन यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 च्या पोट कलम 37 (1)अन्वये मनाई आदेश लागू केले आहेत. नागपूर जिल्ह्यात ग्रामीण कार्यक्षेत्रात पाच किंवा अधिक व्यक्तींची सभा किंवा मिरवणूक काढण्यास मनाई करण्यात आली आहे. हा आदेश 25 एप्रिल ते 9 मे 2024 पर्यंत अंमलात राहणार आहे. कर्तव्यावर असलेल्या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com