पांढरीच्या मारोती मंदिरात हनुमान जन्मोत्सव उत्साहात 

बेला :- गावातील पांढरीच्या मारोती देवस्थानात संकटमोचन हनुमानाचा जन्मोत्सव थाटात व उत्साहात साजरा करण्यात आला. मंदिरासमोरील हनुमान भक्त व ज्येष्ठ नागरिक बळीरामजी रोडे गेल्या 50 वर्षापासून येथे हनुमान जयंती साजरी करतात. यंदाही त्यांच्या कुटुंबीयांतर्फे पहाटे हनुमंताची पूजा अर्चना व अभिषेक करण्यात आला. सदर जागृत व पुरातन देवस्थानात लग्नापूर्वी नवरदेव येथे येतो. व लग्न मंगल कार्य निर्विघ्न पार पडू दे. यासाठी प्रार्थना केली जाते. लोकसहभागातून दोन वर्षांपूर्वीला जीर्णोद्धार केल्यामुळे देवस्थानाचे रूपडे पालटले.हनुमान जयंतीचे निमित्ताने देवस्थानात आयोजित संगीतमय भजनाचा लाभ गावातील व मोहल्यातील भाविकांनी घेतला. रात्रीला असंख्य भक्त स्वरूची भोजनाने तृप्त झाले. जन्मोत्सवाचे यशस्वीतेसाठी पंकज रोडे, मोहल्ल्यातील भक्तगण व रोडे कुटुंबीय व नातलगांनी अथक परिश्रम घेतले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

‘दूरसंचार पायाभूत सुविधा आणि स्पेक्ट्रमचे आदान-प्रदान, तसेच स्पेक्ट्रम भाडेतत्त्वावर देण्याबाबतच्या’ शिफारशी ट्राय कडून जारी

Thu Apr 25 , 2024
नवी दिल्ली :-ट्राय अर्थात भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने ‘टेलिकम्युनिकेशन इन्फ्रास्ट्रक्चर शेअरिंग, स्पेक्ट्रम शेअरिंग, आणि स्पेक्ट्रम लीजिंग’, म्हणजेच दूरसंचार पायाभूत सुविधा आणि स्पेक्ट्रमचे आदान-प्रदान, तसेच स्पेक्ट्रम भाडेतत्त्वावर देण्याबाबतच्या’ शिफारशी आज जारी केल्या. भागधारकांच्या सूचना/सूचनांवरील प्रतिसाद आणि स्वतःच्या विश्लेषणाच्या आधारे, ट्रायने या शिफारशींना अंतिम रूप दिले आहे. शिफारशींचे ठळक मुद्दे पुढील प्रमाणे: दूरसंचार सेवा परवानाधारकांना, सर्व प्रकारच्या दूरसंचार सेवा परवानाधारकांबरोबर संबंधित परवान्याखाली […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com