वराडा येथे अखंड हरिनाम सप्ताह थाटात संपन्न

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

– पालखी, किर्तन, हरिपाठ, भजनासह विविध धार्मिक कार्यक्रमाने अखंड हरिनाम सप्ताह. 

कन्हान :- श्री हनुमान मंदीर वराडा येथे श्रीराम नव मी आणि श्री हनुमान जयंती अखंड हरिनाम सप्ताह पालखी, किर्तन, हरिपाठ, भजनासह विविध धार्मिक कार्यक्रमाने श्रीराम नवमी आणि श्री हनुमान जयंती थाटात साजरी करण्यात आली.

बुधवार (दि१७) एप्रिल ला श्रीराम नवमी च्या दिवशी हनुमान मंदिर वराडा येथे विधिवत पूजा अर्चना करुन पालखी यात्रा काढण्यात आली. पालखी यात्रा संपुर्ण गाव भ्रमण करुन यात्रेचे मंदिरात समापन करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने गावकरी नागरिक सहभागी झाले होते. त्यानंतर दिनांक १८ ते २० एप्रिल पर्यंत दररोज सकाळी व सायंकाळी हरिपाठ भजन, सुंदरकांड पाठ सह विविध धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले.

रविवार (दि.२१) एप्रिल ला बाल किर्तनकार ह. भ.प. कार्तिक महाराज रघटाटे यांचा प्रबोधनपर कीर्त न करण्यात आले. बुधवार (दि.२४) एप्रिल ला दुपारी ह.भ.प.सुमित महाराज बोधले यांचे प्रबोधनात्मक कीर्तन करून गोपाल काल्याचे किर्तन व सायंकाळी भव्य महाप्रसाद वितरण करुन अखंड हरिनाम सप्ताह कार्यक्रमाने श्रीराम नवमी आणि श्री हनुमान जयंती उत्सव मोठ्या उत्साहाने थाटात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता वराडा ग्राम पंचायत सरपंच सुनिल जामदार, बबनराव भिलकर, किशोर टाले, अमोल देऊळकर, शुमभ नागमोते, रोशन जामदार, प्रणय गुरांदे, शुभम पुंड, प्रफुल देऊळकर, पियुष हेटे, राहुल खोब्रागडे, ईश्वर घोडमारे, ओम हेटे, मोहन जामदार, मयुर घोडमारे, हर्षल ठाकरे, स्वप्निल वरखडे, हर्षल नेवारे, उमेश मेश्राम, अक्षय मेश्राम सह गावकऱ्यांनी बहुसंख्येने उपस्थित राहुन सहकार्य केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

CM Shinde के नाम से चर्चित उमरेड के विनोद सावजी में छलक रहे जाम ; बच्चों के सामने परोसी जा रही शराब..!

Thu Apr 25 , 2024
उमरेड के विनोद सावजी भोजनालय में बच्चों के सामने परोसी जा रही शराब..! नागपुर – उमरेड थाना के अंतर्गत विनोद सावजी में अवैध तरीके से खुलेआम शराब परोसा जा रहा है वह एक तरफ नागपुर के पालक मंत्री एवं राज्य के गृह मंत्री देवेन्द्र फडणवीस  और पुलिस अधीक्षक जहां जिले को अपराध मुक्त बनाने में जुटे हुए हैं तो दूसरी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com