नवे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी पदभार स्वीकारला..

आर. विमला यांची महिला व बालविकास विभागाच्या आयुक्त पदी बदली

नागपूर दि. 19 : नागपूरचे नवे जिल्हाधिकारी म्हणून डॉ. विपीन इटनकर यांनी आज मावळत्या जिल्हाधिकारी आर. विमला यांच्याकडून सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात पद पदभार स्वीकारला.

मावळत्या जिल्हाधिकारी आर. विमला यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तर नवे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आर. विमला यांना पुणे येथे बाल कल्याण विभागात आयुक्त पदावर नियुक्तीसाठी शुभेच्छा दिल्या.

डॉ. विपीन इटनकर हे नांदेडचे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते. ते मुळचे चंद्रपूर येथील असून 2014 च्या तुकडीचे आय.ए.एस. अधिकारी आहे. यु.पी.एस.सी. परीक्षेमध्ये राज्यातून प्रथम तर देशातून चौदावा क्रमांक मिळविला होता. त्यांनी नागपूर येथील इंदिरा गांधी शासकीय महाविद्यालयातून एम.बी.बी.एस. केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

दोन वर्षासाठी हद्दपार असलेल्या आरोपीस कामठीत अटक..

Fri Aug 19 , 2022
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी ता प्र 19 :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या ईदगाह मैदानाजवळील मासुमशाह दरगाह येथे आयोजित उर्स निमित्त कामठी पोलीस बंदोबस्त मध्ये कर्तव्य बजावत असताना एक काळ्या रंगाची संशय्यीत दुचाकी बजाज पलसर ने दोन अज्ञात इसम जात असता पोलीस पाहून दुचाकी चालकाने वाहन जोरात पळविण्याचा प्रयत्न केल्याने मागे बसलेला इसम हा रस्त्याचा कडेला खाली […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com