हिवताप आजाराविषयी रॅली अन् प्रदर्शानीच्या माध्यामातून जनजागृती

– मनपाच्या जागतिक हिवताप दिनानिमित्त विविध उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या हिवताप व हत्तीरोग विभागातर्फे जागतिक हिवताप दिनानिमित्त गुरुवारी( ता. २५) मनपाच्या दहाही झोन अंतर्गत विविध ठिकाणाहून हिवताप आजाराविषयी जनजागृती रॅली व प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले.

मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनात व वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांच्या नेतृत्वात अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, हत्तीरोग व हिवताप अधिकारी डॉ. मंजुषा मठपती आणि चमूने राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांना नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शविला.

मनपाच्या दहाही झोन मध्ये काढण्यात आलेल्या रॅलीदरम्यान हिवताप, डेंग्यू व इतर कीटकजन्य आजाराबाबत लोकांचा सहभाग घेऊन जनजागृती करण्यात आली. यावेळी विद्यार्थांनी हातात जनजागृती फलक घेत नागरिकांना आजाराविषयी माहिती दिली. मनपाच्या लक्ष्मीनगर झोन कार्यालय, धरमपेठ झोन येथील आठ रस्ता चौक, हनुमाननगर झोन येथील गणेशनगर महावीर उद्यान, नंदनवन, धंतोली झोन येथील जयभीम चौक बाबुलखेडा, नेहरूनगर झोन येथील सक्करदरा तलाव, बिडीपेठ, गांधीबाग झोन येथील भालदार पुरा, सतरंजीपुरा झोन येथील दही बाजार, लकडगंज झोन येथील विजयनगर आशीनगर झोन येथील कमाल चौक, मंगळवारी झोन येथील गोरेवाडा युपीएससी येथून रॅली काढण्यात आलेल्या भागात हस्तपत्रिका, स्टीकर, पोस्टर आदींचे वितरण करून नागरिकांना हिवतापविषयक माहिती देण्यात आली. यावेळी गर्दीच्या/वर्दळीच्या ठिकाणी प्रदर्शनी लावून नागरिकांना निःशुल्क गप्पी मासे वाटप करण्यात आले. सोबतच विविध शाळांमधील विद्यार्थ्यांचा सहभाग घेऊन परिसरात मलेरिया बद्दल जनजागृती करण्यात आली. रॅलीमध्ये कर्मचाऱ्यांनी, विद्यार्थ्यांनी हातात विविध म्हणी, घोषणाफलक घेत जनजागृती केली. तसेच लाऊड स्पीकरवरून नागरिकांना हिवतापाविषयी माहिती देण्यात आली.

यासोबतच अनुक्रमे आठ रस्ता चौक, ट्रफिक पार्क, लेबेर ठिया, ज्ञानेश्वर नगर, बॅनजी लेआऊट गार्डन, सक्कर्दरा गार्डन,तीननल चौक शांतीनगर गार्डन, भरतवाडा युपीएससी, वैशालीनगर मिलीद बुद्धविहार,जेतवन नगर येथे आरोग्य प्रदर्शनी लावण्यात आली. यामध्ये हिवताप, डेंग्यू तसेच अन्य संसर्गजन्य आजाराविषयी माहिती लावण्यात आली होती. या आजारांची लक्षणे, आजार कसा आणि कशामुळे होतो, या आजारावरील प्रतिबंधात्मक उपाययोजना यासंबंधी विस्तृत माहिती प्रदर्शित करण्यात आली तसेच नि:शुल्क गप्पी मासे वाटप करण्यात आले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

सखे सोबती का रक्तदान शिविर 28 अप्रैल को नागपुर में 

Fri Apr 26 , 2024
नागपूर :- सखे सोबती फाउंडेशन, नागपुर ने 28 अप्रैल को आईएमए हॉल, नॉर्थ अंबाझरी रोड में एक मेगा रक्तदान शिविर का आयोजन किया है। इंडियन मेडिकल एसोसिएशन (आईएमए) नागपुर, जीएमसी नागपुर और आईजीएमसी नागपुर के 1986 बैच के साथ-साथ जीएमसी नागपुर ब्लड बैंक ने शिविर में अपना बहुमूल्य समर्थन दिया है। इस शिविर का आयोजन स्वर्गीय डॉ. श्याम फादी और […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com