शिष्यवृत्ती, शिक्षण फी, परीक्षा फीचे अर्ज 30 एप्रिलपर्यंत स्विकारणार

यवतमाळ :- भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण फी, परीक्षा फी योजनेचे नवीन व नूतनीकरणचे अर्ज स्विकारण्याची अंतिम मुदत दि. 30 एप्रिल ही आहे. या मुदतीत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सदर मुदतवाढ ही अंतिम स्वरुपाची असल्याने दि. 30 एप्रिल पूर्वी अर्ज स्विकारण्याची कार्यवाही करण्यात येईल. या कालावधीनंतर अर्ज प्रलंबित राहिल्यास सर्वस्वी जबाबदारी महाविद्यालयाची राहील, तसेच अर्ज भरलेल्या पात्र विद्यार्थ्यांकडून महाविद्यालयांना शिक्षण शुल्क घेता येणार नाही, असे इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या सहाय्यक संचालक मंगला मुन यांनी कळविले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

प्लास्टिक राक्षस मार्फत जनजागृती, कापडी व ज्यूट पिशव्या वापरण्याबाबत नागरिकांचे प्रबोधन

Fri Apr 26 , 2024
नागपूर :- प्लास्टिक पिशव्यांचा वापर हा लोकांच्या वापराचा अविभाज्य भाग झालेला आहे. प्लास्टिक हे विघटनशील नसल्याने त्याचा पर्यावरणावर प्रतिकूल परिणाम होतो. दिवसेंदिवस वाढत असलेल्या प्लास्टिकच्या वापरामुळे पर्यावरणावर होणारे दुष्परिणाम व परिसरात पसरणारी अस्वच्छता याचे सर्वांना भान असणे अत्यंत आवश्यक आहे. हीच बाब लक्षात घेऊन नागपूर महानगरपालिका आयईसी चमू यांच्या मदतीने ‘प्लास्टिक राक्षस’ तयार करून विविध ठिकाणी ‘प्लास्टिक बंदी’ या विषयावर […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com