कामठी तालुक्यात दिवाळी पर्व हर्षोल्लाहसात साजरा

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा कामठी तालुक्यात दिवाळी पर्व मोठ्या हर्षोल्लाहसाने साजरे करण्यात आले .दिवाळी वर्षातील सर्वात मोठा सण आहे.दिवाळी अर्थात दीपोत्सव,हा केवळ उत्सव नसून उत्सवांचे स्नेहसंमेलन आहे.धनत्रयोदशी ,नरकचतुर्दशी,लक्ष्मीपूजन,बलिप्रतिपदा आणि भाऊबीज या सांस्कृतिक विचारधारा असलेल्या सणांचा उत्सव म्हणजे दिवाळी निमित्ताने काल 12 नोव्हेंबर ला सकाळपासूनच नागरिकांमध्ये उत्सुकता होती.तालुक्यातील शहर तसेच ग्रामीण भागतोल गृहिणींनी सकाळपासूनच आपापल्या अंगणाची स्वच्छता तसेच रांगोळी काढताना दिसून आल्या तर शहरातील मुख्य बाजारपेठ गुजरी बाजार , गोयल टॉकीज रोड परिसर तसेच गांधी चौकासह आदी ठिकाणी आम्रपान, केळीची पाने, गेंदफुल खरेदी करण्यासाठी सकाळपासूनच नागरिकांची गर्दी दिसून आली तसेच दिवणालीपेक्षा पणत्यांच्या दुकानात खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली त्याचप्रमाणे येथे नागरिकांनी मोठ्या प्रमाणात कपडे , दागिने आदींची मोठ्या प्रमाणात खरेदी केली तसेच दिवाळीचा दिवस असल्याने सायंकाळी 8 वाजेसुमारास घरोघरी श्री महालक्ष्मीच्या पूजा अर्चनेची सुरुवात केल्यानंतर आतिषबाजी तसेच फटाक्यांचा आवाज सुरू झाला मात्र वाढत्या महागाईमुळे यावर्षी दिवाळीला फटाक्यांची आतिषबाजी ही फक्त नामधारीच ठरली …..तर या दिवाळी पर्वानिमित्त बाजारात खरेदीसाठी होणारी नागरिकांची गर्दी लक्षात घेता नागरिकांची काळजी घेण्याच्या दृष्टिकोनातून स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक भिताडे यांच्या मुख्य उपस्थितीत गोयल टॉकीज चौक, फेरूमल चौक, सततु हलवाई चौक आदी गर्दीच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता.

NewsToday24x7

Next Post

शेतकरी हिताच्या बांधिलकीचा प्रत्यय - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Tue Nov 14 , 2023
– पीएम कुसुम योजनेत महाराष्ट्र अग्रेसर मुंबई :- पीएम कुसुम योजनेत देशात पहिले स्थान पटकावून महाराष्ट्राने शेतकरी हिताच्या योजनांच्या अंमलबजावणीतील आपली बांधिलकीचा प्रत्यय आणून दिला आहे. हे राज्य बळीराजाचे असून त्यासाठी आपण जाणीवपूर्वक प्रयत्न करत आहोत, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भावना व्यक्त करून राज्याच्या ऊर्जा विभागाचे कौतुक केले आहे. महाराष्ट्राने सुमारे ७१ हजार ९५८ सौर पंप स्थापित केले […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com