सुवर्णा रंगारी यांना समाजभूषण पुरस्कार जाहीर

नागपूर :- साहित्यधारा बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, छत्रपती संभाजीनगर द्वारा दिला जाणारा ‘समाजभूषण पुरस्कार’ नागपूर येथील सामाजिक कार्यकर्त्या सुवर्णाताई रंगारी यांना त्यांच्या सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणीक कार्याचा व प्रबोधनाचा आदर्श लक्षात घेऊन हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

साहित्यधारा बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष डॉ.संघर्ष सावळे यांनी त्यांना याबद्दल तसे पत्र पाठवले आहे. या राज्यस्तरीय पुरस्काराचा वितरण सोहळा दि.५ मे २०२४ रोजी आईन्स्टाईन सभागृह, एमजीएम विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आला आहे. सुवर्णा रंगारी यांच्या द्वारा सामाजिक, सांस्कृतिक तसेच स्त्रीयांच्या आरोग्यविषयक जनजागृती चे कार्य अविरतपणे सुरू असून त्यांच्या या कार्याची दखल घेत हा पूरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मनपा आयुक्तांनी केली लालबहादूर शास्त्री शाळेची पाहणी

Fri Apr 26 , 2024
– विद्यार्थ्यांनी दिली अत्याधुनिक ‘स्टेम लॅब’ची माहिती नागपूर :- नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी गुरुवारी (२५ एप्रिल) हनुमान नगर झोनमधील मनपा लालबहादूर शास्त्री प्राथमिक व माध्यमिक शाळेला भेट देउन पाहणी केली. यावेळी मनपा शिक्षणाधिकारी प्रफुल कछवे उपस्थित होते. पीएम श्री योजने अंतर्गत लाल बहादूर शास्त्री शाळेची निवड करण्यात आली आहे. मनपातर्फे लाल बहादूर शास्त्री शाळेमध्ये विद्यार्थ्यांकरिता […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com