आजची स्त्री ही स्वतःच्या अस्तितवाप्रति जागृत-पोलीस उपनिरीक्षक कल्पना कटारे..

संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी 

कामठी ता प्र 10 :- स्त्री म्हणजे लाजाळू , दुबळी व भावनिक असा समाजात गैरसमज आहे.मुलगी म्हटलं की अनेक बंधने येतात .अंधार होण्यापूर्वी घरी परतलेच पाहिजे, कुणासोबतं जास्त बोलू नये, जास्त फिरू नये अशी समज होऊन बसली आहे परंतु वेळ पडल्यास हीच घरातील लक्ष्मी गुन्हेगाराचा नायनाट करण्यासाठी दुर्गेचे रूप देखील घेऊ शकते .भारतीय संविधानाने दिलेल्या हक्कामुळे पुरुषांच्या खांद्याला खांदा लाऊन चालणारे महिला आज समोरघडीला जात असून कामठी तालुक्याचा विचार केल्यास कामठी तालुक्यातील विविध शासकीय कार्यालयात महिला राज दिसून येत असल्याचे मौलीक मत जुनी कामठी पोलीस स्टेशन चे महिला पोलीस उपनिरीक्षक कल्पना कटारे यांनी आज कामठी नगर परिषद कार्यालयात आयोजित जागतिक महिला दिन कार्यक्रमात व्यक्त केले.याप्रसंगी पोलीस विभागाचे माया अमृ,वैद्यकीय अधिकारी डॉ शबनम खाणुनी,ऍड भीमा बोरकर,माजी नगरसेविका वैशाली मानवटकर,माजी नगरसेविका ममता कांबळे आदी उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला असून कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कार्यक्रमाचे आयोजन कामठी नगर परिषद कर्मचारी घोडेस्वार,कौशल्या शर्मा,पूजा राऊत,गायत्री हडोती,अश्विनी पिल्लारे,माधुरी चहांदे आदींनी मोलाची भूमिका साकारली. .

Email Us for News or Artical - dineshd[email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com