संकल्प वृद्ध सेवा आश्रमाचे थाटात उद्घाटन

नागपूर :- परिवर्तन शील बुध्दिष्ट बहुउद्देशीय संस्थेच्या अंतर्गत संकल्प बाल वृद्ध सेवा आश्रम तक्षशिला नगर, नारी रोड, धम्म मशाल बुध्द विहारा जवळ शुभारंभ करण्यात आला असून यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माजी पालकमंत्री नितिन राऊत यांचे शुभहस्ते मंगळवारी 23 एप्रिल रोजी, उद्घाटन करण्यात आले. वृध्दाश्रम काळाची गरज आहे आणि हिच गरज भागविण्याची समाजाची जवाबदारी आहे. परंतु आज काळ बदलला आहेत त्याच बरोबर बदलली संस्कृति, परंपरा आणि नातीही आणि हाच संकल्प मनात ठेवून अध्यक्षीय भाषणात संगीता चंद्रिकापूरे पाटिल यांनी सांगीतले की ज्या लाचारीमुळे कुठेही जीवनयापन करीत असतात अशा निराधार महिलाना आधार देणे आणि जिवनाच्या शेवटच्या क्षणी आनंदित सुखी जीवन जगणे हे आपल्या समाजाचे कर्त्तव्य आहे आणि हेच ध्येय मनात ठेवून संकल्प बाल वृद्ध सेवा आश्रम चा शुभारंभ करण्यात आला.कार्यक्रमाचे संचालन सुनीता चांदेकर, संगीता चंद्रिकापूरे पाटिल, अनिता राऊत, सविता बोरकर तसेच या शुभारंभाला उपस्थित असलेले प्रो. टि.जी.गेडाम, विज्ञा देशभ्रतार, वैशाली तभाणे, सुरेश उईके, विजया वालदे, महानंदा इलमकर, गंगा, वंदना टेंभुणे, भारती चांदेकर, अनिता तिरपुडे, अरूण हट्टेवार, अनिल पुरी, निलेश चांदेकर, राजन बोरकर आणि मोठया संख्येने कार्यकर्ताची उपस्थिति होती. तसेच याप्रसंगी वृद्धांना संस्थेच्या वतीने साड़या वाटप करण्यात आले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

हिवताप आजाराविषयी रॅली अन् प्रदर्शानीच्या माध्यामातून जनजागृती

Fri Apr 26 , 2024
– मनपाच्या जागतिक हिवताप दिनानिमित्त विविध उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या हिवताप व हत्तीरोग विभागातर्फे जागतिक हिवताप दिनानिमित्त गुरुवारी( ता. २५) मनपाच्या दहाही झोन अंतर्गत विविध ठिकाणाहून हिवताप आजाराविषयी जनजागृती रॅली व प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनात व वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांच्या नेतृत्वात अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com