मॅरेथॉनमध्ये नागराज, प्राजक्ता प्रथम, खासदार क्रीडा महोत्सव २०२३

नागपूर :- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून नागपूर शहरात मागील १४ दिवसांपासून सुरू असलेल्या खसदार क्रीडा महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी रविवारी (ता.२२) सकाळी मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत पुरूष गटात साकार झालेल्या व देशात आदर्श ठरलेल्या खासदार क्रीडा महोत्सवांतर्गत रविवारी (ता. २२) महाराष्ट्र क्लबचा नागराज खुरसूने व नाम्या फाऊंडेशनची प्राजक्ता गोडबोले पुरूष व महिला गटातून अव्वल ठरले. १० किमी, ५ किमी आणि ३ अंतराची मॅरेथॉन स्पर्धा झाली.पुरूषांच्या १० किमी शर्यतीत प्रथम नागराज खुरसूने, ट्रॅक स्टार क्लबचा सौरभ तिवारी दुसरा आणि जय अॅथलेटिक्स क्लबचा लीलाराम बावणे तिसरा आला. महिलांच्या ५ किमी शर्यतीत प्राजक्ता गोडबोले पाठोपाठ बेटिया फाऊंडेशनची आकांक्षा शेलार आणि नाम्या फाऊंडेशनची यामिनी ठाकरे यांनी दुसरे व तिसरे स्थान प्राप्त केले. १६ वर्षाखालील मुलींच्या ३ किमी शर्यतीत हिंदू मुलींची शाळेची जान्हवी हिरूडकर हिने प्रथम क्रमांक पटकाविला. तर ट्रॅक स्टार क्लबची जान्हवी बावणे आणि वि‌द्यार्थी युवक क्रीडा मंडळाची आस्था निंबार्ते यांनी दुसरा व तिसरा क्रमांक पटकाविला. १६ वर्षाखालील मुलांच्या ५ किमीच्या शर्यतीत चंद्रपूरमध्ये नयन देशकरने प्रथम, जय अॅथलेटिक्सचा ओम मत्राम दुसरा आणि ओम साई स्पोर्टिंग क्लबचा हर्षल जोगे तिसरा ठरला.

रविवारी सकाळी यशवंत स्टेडियम येथून आमदार प्रवीण दटके, धंतोली पोलिस स्टेशनच्या पोलिस निरीक्षक प्रभावती येकुर्के, खासदार क्रीडा महोत्सवाचे संयोजक माजी महापौर संदीप जोशी, सचिव डॉ. पीयूष आंबुलकर, आशिष मुकीम, डॉ.पद्माकर चारमोडे, प्रकाश चांद्रायण यांनी स्पर्धेला हिरवी झेंडी दाखवली.

अंतिम निकाल (क्रमांक 1 ते 5)

16 वर्षाखालील मुली – 3 किमी

1. जान्हवी हिरुडकर (हिंदू मुलींची शाळा)- 10.58.25

2. जान्हवी बावणे (ट्रॅक स्टार क्लब)- 11.51.92

3. आस्था निंबार्ते (विद्यार्थी युवक क्रीडा मंडळ) -11.54.73

4. रिता तरारे (वैयक्तिक) – 11.59.02

5. हिमांशी बावणे (ट्रॅक स्टार क्लब)- 11.59.29

16 वर्षाखालील मुले – 5 किमी

1. नयन देशकर (चंद्रपूर) – 18.06.83

2. ओम मत्राम (जय अॅथलेटिक्स) – 18.26.71

3. हर्षल जोगे (ओम साई स्पोर्टींग क्लब) – 18.43.29

4. वैभव शेलेकर (राईट ट्रॅक क्लब) – 18.48.85

5. मनीष धावडे – 18.51.87

महिला खुला गट – 5 किमी

1. प्राजक्ता गोडबोले (नाम्या फाउंडेशन) – 18.35.16

2. आकांक्षा शेलार (बेटीया फाउंडेशन) – 19.26.61

3. यामिनी ठाकरे (नाम्या फाउंडेशन) – 19.28.79

4. ज्योती चौहान (हिंगणा) – 19.30.79

5. रिया दोहतारे (ट्रॅक स्टार क्लब) – 19.37.62

पुरुष खुला गट – 10 किमी 

1. नागराज खुरसूने (नवमहाराष्ट्र क्लब) – 30.57.83

2. सौरभ तिवारी (ट्रॅक स्टार क्लब) – 31.52.93

3. लीलाराम बावणे (जय अॅथलेटिक्स) – 31.53.52

4. रितिक पंचबुद्धे (क्रीडा प्रबोधिनी) – 32.10.87

5. राजन यादव (ट्रॅक स्टार क्लब) – 32.30.43

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

अरूण जोशी शिक्षण महाविद्यालयात ‘जागृती वार्षिक अंकाचे’ विमोचन

Mon Jan 23 , 2023
नागपूर :-अरूण जोशी शिक्षण महाविद्यालय, हनुमान नगर, नागपूर येथे नुकतेच जागृती अंकाच्या विमोचनासाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून मोहन मते, आमदार, नागपूर, कल्याणी हुमने, क्राइम पोलीस निरीक्षक, अजनी, नागपूर, दिव्या धुरडे, माजी नगरसेविका, नागपूर प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक व स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, मुंबईचे विश्‍वस्त व माजी अध्यक्ष अरूण जोशी उपस्थित होते. सन्माननीय […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com