– महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरिता “करिअर – संधी ” व्याख्यानाचे भव्य आयोजन
सावनेर :- स्थानिक लायन्स क्लब आणि भालेराव विज्ञान महाविद्यालय यांचे संयुक्त विद्यमाने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरिता ‘भविष्यातील संधी आणि पर्याय ‘ या करिअर विषयक व्याख्यानाचे महाविद्यालयात यशस्वी आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्रभारी प्राचार्य प्रा. डॉ. सुनील डोंगरे यांनी भूषविले तर राजेश प्रायकर, वरिष्ठ पत्रकार दै. सकाळ प्रमुख अतिथी होते. कौशल्य विकास मार्गदर्शक आणि लेखक डॉ. अनिल इंगुलकर प्रमुख वक्ते म्हणून आणि वत्सल बांगरे चार्टर प्रेसिडेंट लायन्स क्लब सुद्धा उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन प्रा. डॉ. विलास डोईफोडे, अध्यक्ष लायन्स क्लब यांनी केले.
डॉ. अनिल इंगुलकर यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना सोदाहरण व कृतीपूर्ण मार्गदर्शन केले. रोजगार किंवा स्वयंरोजगाराच्या संदर्भात संपूर्ण यशप्राप्ती साठी फक्त ज्ञानार्जन पुरेसे नसून योग्य दिशेने कृतीची जोड आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले. त्यांनी विद्यार्थी जीवनात लक्ष निर्धारित कसे करावे, राज्य, केंद्र आणि खाजगी क्षेत्रात रोजगाराच्या उपलब्ध संधी, स्टार्टअप आणि स्वयंरोजगाराकरिता शासकीय योजनांची सविस्त्तर माहिती दिली.
प्रमुख अतिथी राजेश प्रायकर यांनी सुद्धा प्रसंगी मोलाचे मार्गदर्शन केले. मोबाईलचे फायदे -तोटे, नियमित वाचन लेखनाचे महत्व, पत्रकारिता एक करिअर यावर विचार प्रकट केले. तसेच देशातील वाढत्या विद्यार्थी आत्महत्येवर चिंता व्यक्त करून संयम बाळगण्याचा सल्ला दिला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय प्रा. डॉ. विलास डोईफोडे यांनी दिला. संचालन प्रा. चंद्रशेखर पोटोडे तर आभारप्रदर्शन वत्सल बांगरे यांनी केले. शहरातील भालेराव विज्ञान महाविद्यालय, राम गणेश गडकरी महाविद्यालय, सरस्वती महाविद्यालय, रेवनाथ चोरे महाविद्यालय, आदमने महाविद्यालय येथील जवळपास दोनशे विद्यार्थ्यांनी व्याख्यानाचा लाभ घेतला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेकारिता रुकेश मुसळे सचिव लायन्स क्लब, हितेश ठक्कर कोषध्यक्ष, प्रवीण टोणपे, प्रा. मृणालिनी बांगरे, किशोर सावल, डॉ. शिवम पुण्यानी, डॉ. प्रवीण चव्हाण, ऍड. मनोजकुमार खंगारे, प्रा. प्रवीण दुलारे, विलास सोहगपुरे, किशोर मानकर, सुरेश मेंढे, राजाराम तागडे, आकांक्षा ऋषिया, धनश्री लेकूरवाळे, देवयानी चोरे, साक्षी कुरळकर, प्रियांशु नाचणकर, श्रुती जामदार, पायल लांबट, पूजा घ्यार, स्मृता सौंधीया, स्वेता अनंतवार यांनी अथक परिश्रम घेतले.
नॅक समन्वयक प्रा. मिलिंद बरबाटे, प्रा. रवींद्र भाके, डॉ. प्रशांत डबरासे, डॉ. प्रकाश काकडे, डॉ. अमिता वाटकर, डॉ. प्रविणा साळवे, डॉ. शालिनी साखरकर, डॉ. प्रदीप आठवले, प्रा. विजय जुनघरे, ऍड. अभिषेक मुलमुले, प्रामुख्याने उपस्थित होते.