#Voiceofmeda होते दिवसभर ट्रेंडिंगमध्ये
मुंबई :- ईलेक्ट्रॉनिक्स, रेडिओ आणि डिजिटल माध्यमातील पत्रकारांना श्रमिक वर्गवारीत समाविष्ट करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतल्यानंतर बुधवारी रात्री उशिरापर्यंत ‘व्हॉईस ऑफ मीडिया’वर सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छांचा वर्षांव सुरू होता.
दिवसभर टि्वटरवर व्हॉईस ऑफ मीडिया हा हॅशटॅग ट्रेंडिंगमध्ये होता. राजकीय क्षेत्रातील अनेक खासदार, आमदार, तथा मान्यवरांनी ट्विट करीत सरकारला हा निर्णय घ्यायला लावल्याबद्दल व्हॉईस ऑफ मीडियाचे कौतुक केले. व्हॉईस ऑफ मीडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे, डिजिटल विंगचे जयपाल गायकवाड, टिव्ही विंगचे विलास बढे, रेडिओ विंगचे राष्ट्रीय अध्यख अमोल देशमुख, प्रदेशाध्यक्ष इरफान सय्यद, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अनिल म्हस्के पाटील यांचेही अनेकांनी भेट घेत अभिनंदन केले.
जळगाव खानदेशचे आमदार सुरेश दामू भोळे ऊर्फ राजुमामा यांनी पत्र पाठवत व्हॉईस ऑफ मीडियाचे अध्यक्ष संदीप काळे यांचे अभिनंदन केले. याशिवाय त्यांनी ट्विट करीतही डिजिटल, रेडिओ आणि ईलेक्ट्रॉनिक्स माध्यमातील पत्रकारांना श्रमिक वर्गात आल्याबद्दल शुभेच्छा दिल्या. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी ट्विटरवर तीनही माध्यमातील पत्रकारांचा श्रमिक वर्गात समावेश झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. स्वाभिमानी शेतकरी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी संदीप काळे आणि अनिल म्हस्के असा हॅशटॅग वापरत व्हॉईस ऑफ मीडियाच्या यशबद्दल अभिनंदन केले.
खासदार सुनिल मेंढे यांनी संघटित शक्तीच्या पाठपुराव्याला यश मिळाल्याचे आपल्या ट्विटमध्ये नमूद केले. व्हॉईस ऑफ मीडिया आणि पत्रकारांचे त्यांनी अभिनंदनक केले. आमदार अमित झनक देशभरातील पत्रकारांचा हा विजय असल्याचे आपल्या ट्विटमध्ये नमूद केले. खासदार भावना गवळी यांनीही महाराष्ट्रातील गतीमान सरकारने पत्रकारांना श्रमिक दर्जा दिल्याबद्दल सरकारचे व व्हॉईस ऑफ मीडियाचे आभार मानले व शुभेच्छा दिल्या. सुरेश उज्जैनवाल यांनी संदीप काळे यांच्या कार्याचे कौतुक करीत तमाम पत्रकारांचा शुभेच्छा दिल्या. काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे पाटील यांनी संदीप काळे असा हॅशटॅग वापरत श्रमिक पत्रकारांच्या पत्रकारांच्या वर्गवारी समावेश झाल्याबद्दल व्हॉईस ऑफ मीडियाचे अभिनंदन केले. माजी मंत्री अॅड. यशोमती ठाकूर यांनी व्हॉईस ऑफ मीडियाच्या कार्याचे कौतुक करीत संघटनेला भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. अनंतराव देशमुख यांनीही महाराष्ट्र सरकार आणि व्हॉईस ऑफ मीडियाचे या निर्णयाबद्दल कौतुक करीत शुभेच्छा दिल्या.
संघटनात्मक विजय
रेडिओ, ईलेक्ट्रॉनिक्स आणि डिजिटल माध्यमातील पत्रकारांचा श्रमिक वर्गात समावेश होणे हे कुण्या एकाचे श्रेय नाही. हा निर्णय होणे म्हणजे संघटनात्मक विजय आहे. पत्रकारांचे संघटन झाले, एकी दिसली म्हणून सरकारला हा निर्णय घ्यावा लागला. अशीच एकी कायम राहिली तर भविष्यात पत्रकारांच्या हिताचे अनेक निर्णय नक्कीच होतील.
संदीप काळे, संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष व्हॉईस ऑफ मीडिया