विरसी टोली येथील नागरिकांना पट्टे द्या – सरपंचा लक्ष्मी शंकर चौधरी 

कोदामेंढी :- खात- रेवराल जि. प. क्षेत्र व पं.स. रेवराल क्षेत्र अंतर्गत येणाऱ्या ग्रा.पं.विरशी येथे मागील ३० ते ३२ वर्षांपासून विरशी गावाला लागूनच ४१ घरांची विरशी टोली वसलेली आहे. मात्र त्यांच्याकडे जागेचे पट्टे उपलब्ध नसून, त्यांना शासनाचा घरकुल व इतर शासकीय योजनांचा लाभ घेता येत नाही. याबाबत ग्रा.पं.तर्फे अनेक ठराव व निवेदने संबंधित विभागातील अधिकारी व लोकप्रतिनिधी यांना दिले. नुकतेच या भागाचे आमदार अँड. आशिष जयस्वाल यांनाही निवेदन दिले असून आ.जयस्वाल यांनी विरसी टोली येथील नागरिकांना पट्टे देण्यासाठी संबंधित यंत्रणेला निर्देश द्यावे ,अशी कळकळीची मागणी विरशी टोली येथील नागरिकांसह सरपंचा लक्ष्मी शंकर चौधरी यांनी केली आहे.

NewsToday24x7

Next Post

नागर्जुना अभियांत्रिकीत आंतरराष्ट्रीय परिषदेला देश विदेशातील संशोधकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Sat Jun 3 , 2023
नागपूर :-मैत्रेय एज्युकेशनल सोसायटीच्या “नागर्जुना इन्स्टिटयूट ऑफ इंजिनीअरिंग, टेकनलॉजि अँड मॅनेजमेंट,” तर्फे, “इंटरनॅशनल काँफरन्स ऑन मल्टि डिसीप्लिनरी अप्रोच इन टेकनोलॉजि अँड सोशअल डेव्हलपमेंट, ICMTSD -2023, चे यशस्वी आयोजन दि.२६ व २७ मे २०२३ रोजी करण्यात आले.या आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन दि.२६ मे रोजी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी, तंत्रशिक्षण सहसंचालक डॉ. मनोज डायगव्हाणे, मैत्रेय एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष […]

You May Like

Latest News

The Latest News

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com