गणेश अथर्वशिर्ष या विषयावर सात दिवसांच्या निरूपण मालिकेचे आयोजन ३ मे पासून

नागपूर :- श्री गणेश मंदिर टेकडी, मंदिरात श्री गणपती अथर्वशीर्ष निरूपण मालिका नागपूर नगरीचे आराध्य दैवत असलेल्या श्री गणेश मंदिर टेकडी मंदिरात भगवान श्री गणेशांच्या सर्वाधिक लोकप्रीय आणि श्रेष्ठतम भावार्थाने युक्त असणाऱ्या श्री गणेश अथर्वशिर्ष या विषयावर सात दिवसांच्या निरूपण मालिकेचे आयोजन करण्यात आले आहे.

शुकवार दिनांक 3 मे ते गुरूवार 9 मे 2024 या दरम्यान रोज सायंकाळी 6 ते 7 या वेळात मंदिराच्या महालक्ष्मी सभागृहात गणपत्य तत्वज्ञानाचे अभ्यासक, सुविख्यात लेखक तथा विद्यावाचस्पती प्रा.स्वानंद पुंड यांच्या सुमधुर आणि अभ्यासपुर्ण वाणीतून ही निरूपण मालिका साकारणार आहे.

अथर्वशिर्षाचा नेमका अर्थ ? त्यातील प्रत्येक गोष्टीच्या मागे असणारा गूढार्थ, त्यात असणारी अंतरसंगती आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे आपल्या व्यक्तीमत्वाच्या विविधांगी विकासासह, सुख, शांती, समाधानासाठी अथर्वशिर्षाचे असणारे प्रात्याक्षिक महत्व अशा विविध पैलूंना सादर करणाऱ्या या निरूपण मालिकेचा अधिकाधिक गणेश भक्तांनी लाभ घ्यावा असे श्री गणेश मंदिर टेकडी देवस्थानाच्या विश्वस्त मंडळाच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

आला उन्हाळा तब्येत सांभाळा

Tue Apr 30 , 2024
उन्हाळ्यात आरोग्य सांभाळण्यासाठी प्रतिबंधक उपायांबरोबरच काही दक्षता आणि खाण्यापिण्यावर बंधने ठेवणेही तितकेच महत्वाचे आहे. उन्हाळ्यामध्ये उष्माघाताचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर दिसतात. यात शरीराचे तापमान उच्च पातळीवर जाते. योग्य ते उपचार वेळेवर न मिळाल्यास संबंधित व्यक्ती दगावण्याची शक्यता असते. जागतिक तापमानवाढीमुळे वातावरणात सतत बदल होत आहेत. पूर्वी उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा या ऋतूंचा वेळ-काळ, ठरलेला असायचा. परंतू आता मात्र तसे नाही. जागतिक […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com