संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या खैरी वळणमार्गावर अज्ञात टिप्पर ने समोरील दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत घडलेल्या गंभीर अपघातात बिना संगमहुन पुण्यानुमोदन कार्यकम आटोपून दुचाकीने नागपूर कडे येत असलेले नागपूर रहीवासी पती पत्नी रक्तबंबाळ होऊन पडले असताना वेळीच खैरी ग्रा प चे माजी सरपंच मोरेश्वर उर्फ बंडू कापसे यांनी त्वरित मदतीची धाव घेत पुढाकार घेऊन दोन्ही जख्मि पती पत्नींना कामठी च्या आशा हॉस्पिटल येथे उपचारार्थ दाखल केले.वेळीच वैद्यकीय उपचार मिळाल्याने पती पत्नीचा बचाव झाला असून माजी सरपंच बंडू कापसे यांच्या पुढाकाराने पती पत्नी चे प्राण बचावले.प्राण बचावलेल्या पती पत्नीचे नाव शिवचंद तुप्पट व मीना तुप्पट दोन्ही राहणार वनंदनवन नागपूर असे आहे.
पोलिसांनी सदर घटनेची नोंद घटनास्थळा हुन पळ काढलेल्या आरोपी ट्रक चालका विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.तर सदर घटनास्थळ मार्गे असलेला खैरी वळण मार्ग हा धोकादायक ठरला असून अपघाती मृत्यूस निमंत्रक ठरत आहे .या मार्गावर संबंधीत विभागाने झेब्रा क्रॉसिंग सह आवश्यक त्या सुविधा न केल्याने वाहतूक दारासाठी धोक्याचे ठरत आहे.तेव्हा संबंधित विभागाने यावर तात्काळ उपाययोजना करून योग्य त्या सुव्यवस्था करून अपघाती मृत्यूस निमंत्रक ठरलेल्या घटनांना आळा बसवावा अशी मागणी येथील माजी सरपंच बंडू कापसे यांनी केले आहे.