एस.के. पोरवाल महाविद्यालयाची सिमरन बर्वेने राष्ट्रीय मायक्रोबायोस्लेट स्पर्धेत टॉप 10 मध्ये 

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- कामठी येथील एस. के. पोरवाल कॉलेजची बी. एस्सची सिमरन बर्वे या विद्यार्थिनींनी राष्ट्रीय मायक्रोबायोस्लेट या स्पर्धेत टॉप १० च्या यादीत आपले स्थान बळकट करून महाविद्यालयाचे नाव प्रकाश झोतात आणले आहे.

स्कूल ऑफ लाइफ सायन्सेस, कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ व गवर्नमेंट ऑफ इन्स्टिट्युट औरंगाबादच्या सहकार्याने आयोजित स्पर्धेत सिमरन बर्वे हिने मायक्रोबायोस्लेट आपले ९ वै स्थान पटकाविले. सिमरन बर्वे यांच्या अनुकरणीय शैक्षणिक कामगिरीमुळे पोरवाल महाविद्यालयाला पदक आणि प्रमाणपत्र बहाल करण्यात आले. या सत्कार समारंभास गवर्नमेंट ऑफ इन्स्टिट्युट औरंगाबादचे संचालक डॉ. सातपुते यांनी मार्गदर्शन केले. आणि गवर्नमेंट ऑफ फॉरेन्सिक सायन्स इन्स्टिट्युट चे संचालक व फौंउडरचे डॉ. उल्हास पाटील सर या प्रसंगिक उपस्थित होते.या प्रसंगी पोरवाल महाविद्यालयाच्या प्रतिनिधी आभा मानापुरे, तसेच  डॉ. नेहा देशेट्टीवार यांचाही सत्कार सन्माननीय पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला. सिमरन बर्वे यांची उत्कृष्ट कामगिरी ही विद्यार्थी आणि महाविद्यालयातील प्राध्यापक या दोघांच्याही मेहनत आणि समर्पणाचा पुरावा आहे. हे यश निःसंशयपणे इतर विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक कार्यात समान उत्कृष्टतेचे ध्येय ठेवण्यासाठी प्रेरणा देईल आणि प्रेरित करेल. सिमरन बर्वे यांनी आपल्या यशाचे श्रेय महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोफेसर डॉ.विनय चव्हाण तसेच मायक्रोबायोलॉजी विभागाचे विभागप्रमुख डॉ. आलोक राय  व सा.प्राध्यापक  सुरज कोंबे यांना दिले आहे.

महाविद्यालय प्रशासन आणि मायक्रोबायोलॉजी आणि बायोकेमिस्ट्री विभागाच्या प्राध्यापकांनी सुद्धा सिमरन बर्वे यांचे अभिनंदन केले आणि तिच्या भविष्यातील सर्व प्रयत्नांना यश मिळावे यासाठी शुभेच्छा दिल्या.सिमरन बर्वे यांच्या यशाचे कौतुक महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी सुद्धा केलेली आहे.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com