पी.वेलरासू कोकण विभागाचे नवे महसूल आयुक्त

नवी मुंबई :- कोकण विभागात विकासाच्या दृष्टीने काम करण्यास भरपूर संधी आहे. कोकणातील नागरिकांना महसूल विभागातर्फे सूलभ सेवा देण्यासाठी माझे प्रयत्न राहतील. कोकण विभागातील अनुभवी अष्टपैलू अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने नागरिकांना सेवा पुरवण्यावर भर देणार असल्याचे नवनिर्वाचित आयुक्त पी. वेलरासू यांनी सांगितले. वेलरासू यांनी आज कोंकण विभागीय महसूल आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारला.

कोकण विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांची नवी मुंबई मधील एस आर ए विभागात बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी. वेलारसू यांची कोकण आयुक्त पदी नियुक्ती करण्यात आली.

वेलरासू हे 2002 च्या भारतीय प्रशासन सेवेतील अधिकारी आहेत. पी. वेलरासू यांना जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आणि नाशिक व ठाणे जिल्हाधिकारी, महाराष्ट्र जीवन प्राधीकरणात सदस्य सचिव अशा महत्त्वाच्या पदांवर काम करण्याचा अनुभव आहे. कोकण विभागीय आयुक्त म्हणून काम करण्याचा हा पहिलाच अनुभव आहे. पी. वेलरासू यांचे मास्टार्स इन पब्लिक अफेअर पब्लिक पॉलीसी ॲनालीसीचे शिक्षण कॅलीफोरनीया विद्यापीठातून झाले आहे. त्यांनी अर्थशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण केले आहे.

यावेळी आयुक्त पी. वेलरासू यांनी कोकण विभागीय कार्यालयासह महसूलच्या विविध विभागांची पाहणी केली. आणि कोकण भवन मधील महत्त्वाच्या विभागांच्या विभाग प्रमुखांशी चर्चा केली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची जयंती साजरी

Tue Apr 30 , 2024
कन्हान :- नगरपरिषद कार्यालयात राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची जयंती विनम्र अ़भिवादन करून ग्राम जयंती म्हणुन साजरी करण्यात आली. मंगळवार (दि.३०) एप्रिल २०२४ ला नगरपरिषद कन्हान-पिपरी येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ११५ व्या जयंती निमित्य राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या प्रतिमेला नगरसेवक विनय यादव व नगरपरिषद विभाग प्रमुख यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण आणि विनम्र अभिवादन करून ग्राम जयंती म्हणुन साजरी करण्यात आली. कार्यक्रमास आस्थापना विभाग […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com