नागर्जुना अभियांत्रिकीत आंतरराष्ट्रीय परिषदेला देश विदेशातील संशोधकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नागपूर :-मैत्रेय एज्युकेशनल सोसायटीच्या “नागर्जुना इन्स्टिटयूट ऑफ इंजिनीअरिंग, टेकनलॉजि अँड मॅनेजमेंट,” तर्फे, “इंटरनॅशनल काँफरन्स ऑन मल्टि डिसीप्लिनरी अप्रोच इन टेकनोलॉजि अँड सोशअल डेव्हलपमेंट, ICMTSD -2023, चे यशस्वी आयोजन दि.२६ व २७ मे २०२३ रोजी करण्यात आले.या आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन दि.२६ मे रोजी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी, तंत्रशिक्षण सहसंचालक डॉ. मनोज डायगव्हाणे, मैत्रेय एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष इंजि.मदन माटे, सचिव अजय वाघमारे, परिषदेचे अध्यक्ष डॉ. संजय केलो, सल्लागार राहुल ब्राह्मणे व निमंत्रक डॉ.मुरलीधर रहांगडाले मंचावर उपस्थित होते. न्यूयॉर्क अमेरिका येथील मॉर्गन स्टॅन्ली चे व्हाइस प्रेसिडेंट धर्मेंद्र अवसरमोल यांच्या बीज भाषणाने परिषदेची सुरुवात करण्यात आली. त्यांनी आपल्या बीज भाषणात कश्या प्रकारे नवनवीन व अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून आपण सामाजिक क्रांती घडवून आणू शकतो यासंदर्भात भाष्य केले. त्यानंतर विविध सत्रांच्या माध्यमातून १३५ शोधनिबंध प्रस्तुत करण्यात आले. ह्या परिषदेत देश विदेशातील विविध विषयावर संशोधन पर १८६ पेपर आले होते. शैक्षणिक व औद्योगिक क्षेत्रातील अंदाजे २७५ प्रतिनिधीनीं फेसबुक लाईव्ह व युट्यूब लाईव्ह च्या माध्यमातून परिषदेचा लाभ घेतला.

या आंतरराष्ट्रीय परिषदेचे औचित्य साधून महाविद्यालयाच्या वार्षिक जर्नी २०२३ मासिकाचे व आंतरराष्ट्रीय परिषद कार्यवाही पुस्तकाचे अनावरण प्रमुख पाहुण्यांचा हस्ते करण्यात आले. आंतरराष्ट्रीय परिषदेचे प्रमुख वक्ते, सत्राचे अध्यक्ष आणि विषय तज्ञ यांचे स्वागत प्रा.कुशल यादव, प्रा.अतुल आकोटकर, प्रा.अश्विनी वालदे, प्रा.स्वाती सोनटक्के या संनव्यय समितीतर्फे करण्यात आले. प्रत्येक सत्रात सर्वोत्तम शोधनिबंध आणि सर्वोत्तम सादरीकरण असे दोन पारितोषिक वितरण करण्यात आले. यमन येथील संशोधन अभ्यासक इब्राहिम फकली यांनी ICMTSD-2023 या आंतरराष्ट्रीय परिषदे बद्दल अभिप्राय देतांना परिषदेच्या प्रयोजनाचा उद्देश साध्य झाला असे नमुद केल तसेच व उत्कृष्ट नियोजनाची स्तुती केली. तसेच ऑनलाईन व ऑफलाईन घेण्यात आलेल्या अभिप्रायांमध्ये सर्वांनीच सुयोजनाची व उद्देश्य पूर्ततेची पोचपावती दिली तसेच महाविद्यालयाच्या या उपक्रमा बद्दल व भविष्यातिल पुढील वाटचालीं करीता भरभरून शुभेच्छा दिल्या.

आंतरराष्ट्रीय परिषदिला यशस्वी करण्याकरिता डॉ.एस.खान, प्रा.बिना रेवतकर, प्रा.प्रिया फरकाडे, प्रा.अमित मेश्राम, डॉ.योगेश बैस, प्रा.दर्शना खडसे, प्रा.संजय बनकर, प्रा.मनिष थुल, प्रा.आतिफ नवाब, प्रा.जयेश तांदुळकर, प्रा.शुभम इंगोले, प्रा.वैष्णवी ठमके, डॉ.जयगोपाल अंबादे, प्रा.संदिप ठाकरे, प्रा. सचिन मते, प्रा.रसिक उपाध्याय, प्रा.चार्ली फुलझेले, डॉ.मोईन देशमुख, प्रा.हर्षा मेश्राम, प्रा.मयूर मालते, प्रा.वैष्णवी बोपचे आणि यांच्यासह विद्यार्थी स्वयंसेवक या सर्वांनी अथक परिश्रम घेतले.

प्रा.फाजेला फरोज यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. प्रा.वृषाली पराये यांनी प्रमुख पाहुण्यांचे तसेच प्रा.अमित मेश्राम यांनी कार्यक्रमाच्या अध्यक्षांचा परिचय करून दिला. कार्यक्रमाचे संयोजक प्रा.कुशल यादव यांनी आभार मानले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

व्हॉईस ऑफ मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव..!, ट्विटरवर खासदार,आमदारांकडुन अभिनंदन

Sat Jun 3 , 2023
#Voiceofmeda होते दिवसभर ट्रेंडिंगमध्ये मुंबई :-  ईलेक्ट्रॉनिक्स, रेडिओ आणि डिजिटल माध्यमातील पत्रकारांना श्रमिक वर्गवारीत समाविष्ट करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतल्यानंतर बुधवारी रात्री उशिरापर्यंत ‘व्हॉईस ऑफ मीडिया’वर सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छांचा वर्षांव सुरू होता. दिवसभर टि्वटरवर व्हॉईस ऑफ मीडिया हा हॅशटॅग ट्रेंडिंगमध्ये होता. राजकीय क्षेत्रातील अनेक खासदार, आमदार, तथा मान्यवरांनी ट्विट करीत सरकारला हा निर्णय घ्यायला लावल्याबद्दल व्हॉईस ऑफ मीडियाचे कौतुक […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com