राजधानीत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंती साजरी

नवी दिल्ली :- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची जयंती आज महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्रात साजरी करण्यात आली.

कॉपरनिकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात निवासी आयुक्त रूपिंदरसिंग यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. यावेळी अपर निवासी आयुक्त डॉ.नीवा जैन, सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार व स्मिता शेलार यांच्यासह महाराष्ट्र सदनाच्या कर्मचाऱ्यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

महाराष्ट्र परिचय केंद्रात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना अभिवादन

महाराष्ट्र परिचय केंद्रात आयोजित कार्यक्रमात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना अभिवादन करण्यात आले. परिचय केंद्राचे उपसंचालक (मा.) अमरज्योत कौर अरोरा यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून विनम्र अभिवादन केले. कार्यालयात उपस्थित कर्मचाऱ्यांनीही यावेळी त्यांना श्रद्धांजली वाहिली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

ट्रकच्या धडकेत ऑडी कार चे नुकसान, ट्रक जप्त

Tue Apr 30 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कन्हान :- पोलीस स्टेशन अंतर्गत तारसा रोड बोरी सिंगोरी शिवारात ट्रक चालकाने कोणतेही इंडिकेटर न देता ट्रक मागे (रिवर्स) घेऊन उभ्या असलेल्या कार ला धडक दिल्याने झालेल्या अपघातात ऑडी कारचे मोठे नुकसान झाल्याने पोलीसांनी ट्रक ला ताब्यात घेऊन ट्रक चालका विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. प्राप्त माहिती नुसार रविवार (दि.२८) एप्रिल ला नंदु रामजी कठाने वय […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com