रेतीची अवैध वाहतूक एका ट्रकावर कारवाई, 20 लाख 36 हजाराचा मुद्देमाल जप्त

– कन्हान पोलीसांची कारवाई 

कन्हान :- कन्हान पोलिसांनी पोलीस ठाणे हद्दित रेतीची अवैध वाहतुक करणाऱ्या एका टिप्परवर कारवाई करून एकुण 20 लाख 36 हजाराचे मुद्देमाल जप्त केला आहे.

सदर कारवाई सोमवार ( दि.29 एप्रिल ) च्या सकाळीं 11.00 ते 11.30 वाजता दरम्यान केली आहे.

पोलिसांना कडून मिळालेल्या माहितीनुसार कन्हान पोलीस स्टेशन हद्दिततील मौजा सिहोरा येथे पेट्रोलिंग करित असतांना तारसा रोड मार्गावरील निलज (खंडाळा) शिवारात एका निळा रंगाची टाटा कंपनीचे 10 चाक्की टिप्पर ट्रक एमएच- 49-एटी-1817 मध्ये 6 ब्रास रेती वाहतूक करीत आहे. अशी गुप्त माहिती मिळाल्याने कन्हान पोलिसांनी तारसा रोड वरील वाघधरे वाडी पुलाचा खाली नाका बंदी करीत 10 चाक्की टिप्पर ट्रकला अडवून चौकशी केल्यावर त्या बिना परवाना रेत (वाळु) रॉयल्टी नसून अवैधरित्या रेत तस्करी करत असल्याचे पोलिसांना समजले असता आरोपी चालक मालक यांनी टिप्पर ट्रक सोडून पसार झाले. पोलिसांनी निळा रंगाची टाटा कंपनीचे 10 चाक्की टिप्पर ट्रक एमएच- 49-एटी-1817 मध्ये 6 ब्रास रेती सह टिप्पर ट्रक ताब्यात घेत 20 लाख किमतीचा टिप्पर , 6 ब्रास रेती क़ीमत 36 हजार असा एकूण 20 लाख 36 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. असुन पोलीस स्टेशन कार्यरत पो.शि. निखिल उदयशंकर मिश्रा यांच्या तक्रारीवरून फरार आरोपी चालक व मालक विरुद्ध कलम 379 इतर कलमानव्ये तसेच महराष्ट्र महसूल अधिनियम नुसार गुन्हा नोंद करून कन्हान पोलीस आरोपी चालक व मालक शोध घेत पुढील तपास करीत आहे. सदर कारवाई कन्हान पोलीस स्टेशन ठाणेदार उमेश पाटील याच्या मार्गदर्शनात पोलिस कर्मचारी सतीश फुटाणे , आशिक कुंभरे , निखिल मिश्रा ,कोमल खैरे , रवि मिश्रा , दिपक कश्यप यांच्यासह पथकाने केली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

गणेश अथर्वशिर्ष या विषयावर सात दिवसांच्या निरूपण मालिकेचे आयोजन ३ मे पासून

Tue Apr 30 , 2024
नागपूर :- श्री गणेश मंदिर टेकडी, मंदिरात श्री गणपती अथर्वशीर्ष निरूपण मालिका नागपूर नगरीचे आराध्य दैवत असलेल्या श्री गणेश मंदिर टेकडी मंदिरात भगवान श्री गणेशांच्या सर्वाधिक लोकप्रीय आणि श्रेष्ठतम भावार्थाने युक्त असणाऱ्या श्री गणेश अथर्वशिर्ष या विषयावर सात दिवसांच्या निरूपण मालिकेचे आयोजन करण्यात आले आहे. शुकवार दिनांक 3 मे ते गुरूवार 9 मे 2024 या दरम्यान रोज सायंकाळी 6 ते […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com