हज यात्रेकरुंना प्राधान्याने सोई-सुविधा पुरवा – विभागीय आयुक्त बिदरी

Ø ‘हज यात्रा’ सुविधा संबंधी आढावा

नागपूर :- हज यात्रेसाठी नागपूर येथून प्रस्थान करणाऱ्या यात्रेकरुंना प्राधान्याने आवश्यक सोई-सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी विविध विभाग प्रमुखांना सोपविलेली जबाबदारी वेळेत व चोखपणे पूर्ण करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी आज दिले.

विभागीय आयुक्त कार्यालयात बिदरी यांच्या अध्यक्षतेखाली ‘हज यात्रा २०२४’ सुविधा संबंधी आढावा बैठक झाली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा, सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त प्रदीप कुलकर्णी, महाराष्ट्र राज्य हज समितीचे कार्यकारी अधिकारी इम्तीयाज काजी, पोलीस प्रशासन, महानगरपालिका, विमानतळ प्रशासन, वाहतूक शाखा, सार्वजनिक बांधकाम विभाग, स्टेट बॅंक ऑफ इंडिया, एअर इंडिया आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

नागपूर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाहून हज यात्रेसाठी दिनांक २६ मे ते ९ जून २०२४ दरम्यान महाराष्ट्र, छत्तीसगड आणि मध्यप्रदेशातील हज यात्रेकरु प्रस्थान करणार आहेत. तर दिनांक १ ते २१ जुलै २०२४ दरम्यान यात्रेकरु हज यात्रेवरुन परतणार आहेत. या दरम्यान यात्रेकरुंची शहरातील ‘हज हाऊस’ येथे निवासाची व्यवस्था करण्यात येणार आहे.

हज हाऊस येथे यात्रेकरुंसाठी उभारण्यात येणारे विविध मदत कक्ष, विमानतळावर पुरविण्यात येणाऱ्या आवश्यक सुविधा तसेच विमानतळावरील मदत कक्षांच्या तयारीबाबत यावेळी आढावा घेण्यात आला. यात्रेकरुंचा ‘हज हाऊस’ येथील वास्तव्य तसेच विमानतळ परिसरातील व्यवस्था याबाबत संबं‍धित शासकीय यंत्रणांनी पुरवावयाच्या सुविधा व व्यवस्थेबाबत गतीने कार्य करावे व उत्तमोत्तम सोईसुविधा उपलब्ध करुन द्याव्या, अशा सूचना यावेळी बिदरी यांनी दिल्या.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

रेतीची अवैध वाहतूक एका ट्रकावर कारवाई, 20 लाख 36 हजाराचा मुद्देमाल जप्त

Tue Apr 30 , 2024
– कन्हान पोलीसांची कारवाई  कन्हान :- कन्हान पोलिसांनी पोलीस ठाणे हद्दित रेतीची अवैध वाहतुक करणाऱ्या एका टिप्परवर कारवाई करून एकुण 20 लाख 36 हजाराचे मुद्देमाल जप्त केला आहे. सदर कारवाई सोमवार ( दि.29 एप्रिल ) च्या सकाळीं 11.00 ते 11.30 वाजता दरम्यान केली आहे. पोलिसांना कडून मिळालेल्या माहितीनुसार कन्हान पोलीस स्टेशन हद्दिततील मौजा सिहोरा येथे पेट्रोलिंग करित असतांना तारसा रोड […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com