राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना विभागीय आयुक्त कार्यालयात अभिवादन

नागपूर :- महाराष्ट्रातील एक आधुनिक संत, कवी, समाजसुधारक व राष्ट्रीय उत्थानाची सतेज भावना असलेले राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची जयंती आज विभागीय आयुक्त कार्यालयात साजरी करण्यात आली.         आयुक्तालयातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त प्रदीप कुलकर्णी यांनी तुकडोजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तहसिलदार महेश सावंत आणि एन.एम. ठाकरे, विभागीय माहिती केंद्राचे प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी रितेश भुयार, नायब तहसिलदार सर्वश्री आर.के. डिघोळे, नितीन डोईफोडे, टि.आर.कावडकर, रेवती कारखानीस यांच्यासह उपस्थित अधिकारी कर्मचाऱ्यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

महाराष्ट्र दिनानिमित्त नागपूर विभागात सकाळी ८.०० वाजता सर्व जिल्ह्यांच्या मुख्यालय स्थळी ध्वजारोहण

Tue Apr 30 , 2024
– उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागपुरात ध्वजारोहण नागपूर :- महाराष्ट्र राज्याचा ६५वा स्थापना दिन आज १ मे २०२४ रोजी राज्यभर साजरा होत असून नागपूर विभागातील सर्व जिल्ह्यांच्या मुख्यालय स्थळी सकाळी ८.०० वाजता पालकमंत्री, जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण होणार आहे. नागपुरचा मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कस्तुरचंद पार्क येथे होणार आहे. भंडारा येथील […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com