– विदर्भ राज्य आंदोलन समिती च्यावतीने पूर्ण ११ जिल्ह्यात महाराष्ट्र दिनाचा १ मे रोजी निषेध करून तिव्र आंदोलन करणार
नागपूर :- विदर्भ राज्य आंदोलन समिती च्या वतीने सार्वत्रीक विदर्भातील निवडणुकीची रण धूमाळी संपल्या संपल्यास नव्या येणाऱ्या सरकारला चेतावनी देण्याच्या दृष्टीने व विदर्भाचे स्वत्रंत राज्य तात्काळ निर्माण करण्याच्या हेतुने विदर्भ निर्मितीचा आंदोलनाची सातत्या ठेवण्याच्या दृष्टीने १ मे हा निषेध दिन (काळा दिवस) आपल्या भावणा व्यक्त करण्याच्या दृष्टीने विदर्भातील ११ ही जिल्हात जिल्हयास्थळी काळया पट्टया / काळा गणवेश / काळी टोपी व काळा स्कार्प किंवा दुपट्टा शरीराच्या कोणताही दर्शणी भागी बांधुन / लावून जिल्हा मुख्यालयाच्या शहरातील केंद्र स्थळी महापुरूषांच्या पुतळया समोर महाराष्ट्र दिनाचा निषेध केला जाईल.
तसेच येणाऱ्या नव्या केंद्र सरकारला ११९ वर्षापासून सुरू असलेली स्वतंत्र विदर्भ राज्याच्या निर्मितीची मागणी कायमची निकाली काढण्याच्या दृष्टीने सुरू केलेली युद्धाची घोषणा करून आंदोलन टोकाला नेऊन कायमची निकाली काढण्याच्या दृष्टीने नव्या येणाऱ्या केंद्र सरकारला घटनेतील आर्टीकल ३ प्रमाणे हे राज्य तात्काळ निर्माण करावे असा इशारा देण्या करता निर्दशने आंदोलन सर्व जिल्हयात दुपारी १२ वाजता पासून १ मे २०२४ ला केले जाणर आहे. परत तीव्र आंदोलनाचे बिगुल नवे सरकार निर्माण होतास तीव्र आंदोलन करून वाजविले जाणार आहे. विदर्भ राज्य आंदोलन सभेच्या वतीने पत्रकार परिषदेमध्ये मंचावरील ॲड. वामनराव चटप, डॉ. श्रीनिवास खांदेवाले, अरुण केदार, मुकेश मासुरकर, डॉ. रमेश गजबे, नरेश निमजे, ॲड. मृणाल मोरे, प्रशांत जयकुमार, रवींद्र भामोडे, गुलाबराव धांडे, यांची उपस्थिती होती.