आदिम युथ फाऊंडेशनचे समाजभूषण व अन्य पुरस्काराचे वितरण

– सामाजिक व राजकीय क्षेत्रात अग्रेसर असलेला ॲड. नंदा पराते ह्या समाजभूषण या सर्वोच्च पुरस्काराने संन्मानीत 

नागपूर :- आदिम युथ फाऊंडेशनच्या माध्यमाने गांधीबाग येथील जैन भवनात गणमान्य व्यक्तींना समाज भूषण व अन्य पुरस्कार वितरणाचे कार्यक्रम संपन्न झाले. या कार्यक्रमात समाजातील श्रेष्ठ व जेष्ठ नागरिकांची प्रचंड उपस्थिती होती. पुरस्कार वितरण कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज, भगवान बिरसा मुंडा , महात्मा जोतिबा फुले, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज, सावित्रीबाई फुले,राजमाता जिजाऊ यांच्या फोटोला मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांनी माल्यपूर्ण करून अभिवादन केले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सुप्रसिद्ध कामगार नेते विश्वनाथ आसई तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी अपर जिल्हाधिकारी चंद्रभान पराते हे होते. पुरस्कार वितरण कार्यक्रमाच्या मंचावर प्रकाश निमजे, अनिता पराते, प्रा.देवराम नंदनवार, कीर्तिकुमार पराते, वामन कुंभारे, भाऊराव पारखेडकर, रामा नंदनकर हे उपस्थित होते.

आदिम युथ फाऊंडेशनच्या पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे अध्यक्ष विश्वनाथ आसई म्हणाले कि आदिम हलबा समाजानेही अनेक वर्ष अन्याय सहन केला, आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाच्या विरोधात नाही, पण अपर जिल्हाधिकारी चंद्रभान पराते यांना शासन सेवेतून बडतर्फ केले. न्यायालयाच्या आदेशाची अवहेलना करून चंद्रभान पराते यांना अपर जिल्हाधिकारी पदावरून सेवानिवृत्त केले नाही,असे प्रकारे कर्मचारी व अधिकारींवर अन्याय आणि विश्वासघात करणाऱ्या सत्ताधारी पक्षाला त्यांची जागा दाखविण्याची गरज होती ,त्याप्रमाणे आदिम हलबा बांधवांनी विश्वासघाताचा बदला घेतला आहे. एकजूट असलेला हलबांचे संवैधानिक प्रश्न सोडविले गेले नाही तर विदर्भातील हलबा समाज सत्ता पक्षास त्यांची जागा दाखविण्यास तयार राहतील. आमची शक्तीचा वापर आता गुलाम म्हणून कोणाला करता येणार नाही. असे प्रतिपादन केले.

आदिम युथ फाऊंडेशनच्या माध्यमाने महाराष्ट्रात सामाजिक व राजकीय क्षेत्रात अग्रेसर असलेला आदिम व कॅाग्रेस नेत्या ॲड. नंदा पराते यांची सर्वोत्तम पुरस्कार समाजभूषण या पुरस्कारासाठी निवड झाली. गांधीबागातील जैन भवन येथील भरगच्च सभेत ॲड. नंदा पराते यांना समाजभूषण या सर्वोच्च पुरस्काराने संन्मानीत करून जाहीर सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात समाज भूषण म्हणून राजू नंदनवार याचा सत्कार झाला.

मंचावरील मान्यवरांनी समाज गौरव पुरस्कार चुडामण बल्हारपुरे ,सागर कुंभारे,रमेश बाजीराव यांना दिले तर समाज रत्न पुरस्कार गोपाल हेडाऊ,राजेश धकाते , रमेश संत यांना देण्यात आहे.भारतातून उत्कृष्ठ संस्था म्हणून आदिवासी हलबा समाज विकास संस्था यांना तर हलबा योद्धे म्हणून शिवानंद सहारकर, प्रा. अभय धकाते यांना तर रणरागिणी म्हणून प्रीती शिंदेकर , छाया खापेकर, प्रा. यशश्री नंदनवार देण्यात आले. विशेष सत्कार म्हणून क्रिकेट यंग कोच योगेश खडगी आणि राष्ट्रीय स्तरावर प्रथम स्थान प्राप्त करणारे यश शिंदेकर यांचे करण्यात आले. .

या पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे संचालन प्रकाश दुलेवाले तर प्रस्तावना विनायक वाघ यांनी केली . आभार प्रदर्शन हरेश निमजे यांनी केली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आदिम युथ फाऊंडेशचे अध्यक्ष सचिव ओमप्रकाश पाठराबे, किशीर पाटणकर, सुरेश हेडाऊ,उदय पराते, मेघनाथ सोरते, शंकर बुरडे, ऍड राकेश पाठराबे ,सुभाष चिमुरकर,रमेश निनावे, प्रेमनाथ रामटेकर ,प्रमिला पराते, रामकृष्ण धार्मिक,रमेश वडिखाये ,हरी चिचघरे यांनी अथक परिश्रम केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

नदी सफाई अभियानाचे कार्य प्रगतीपथावर

Tue Apr 30 , 2024
– नाग नदीच्या अंबाझरी जवळील पात्राची रुंदी वाढणार नागपूर :- नागपूर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनात आणि अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल यांच्या नेतृत्वात नागपूर शहरातून वाहणा-या नाग नदी, पिवळी नदी आणि पोहरा नदी या तिन्ही नद्यांच्या स्वच्छतेचे कार्य प्रगतीपथावर आहे. १ फेब्रुवारी २०२४ पासून सुरु झालेल्या नदी आणि नाले स्वच्छता अभियानामध्ये आतापर्यंत शहरातील तिनही नद्यांची […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com