केन्द्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा शुभ हस्ते अपंग लोकांना ई-रिक्शा वाटप – कृष्णा खोपडे

नागपूर :- नितीन गडकरी केन्द्रीय मंत्री यांचा शुभ हस्ते स्मार्ट सिटी प्रोजेक्ट अंर्तगत अपंग बेरोजगार युवकांना हेल्थ चेकअप, म. न. पा. समाज कल्याण विभाग यांनी दिलेल्या यादी अनुसार व RTO व्दारा लायसंस वितरीत झालेल्या व्यक्तींना 100 ई-रिक्शा वाटपाचा सोहळा दि. 26/05/2023 रोजी सायंकाळी 5 वाजता भवानी माता मंदिर पटांगण पारडी येथे होणार आहे. समाजाचा अपंग नागरीकांना रोजगार मिळण्याचा दृष्टीकोनातुन व स्वताचा पायावर उभे राहुन यांना स्मार्ट सिटी च्या प्रजेक्ट अंर्तगत नितीन गडकरी यांच्या माध्यमातून या मुलांचे भविष्य उज्वल होण्याचा दृष्टीकोनातुन पहिला हा उपक्रम आहे. या कार्यक्रमात चंद्रशेखर बावनकुळे यांचा अध्यक्षतेखाली होणार असून, आमदार प्रविण दटके, आमदार विकास कुंभारे, आमदार मोहन मते व अन्य मान्यवरांचा उपस्थीतीत हा सोहळा होणार आहे तरी नागरीकांनी या कार्यक्रमाला मोठया संख्येने उपस्थीत राहावे ही विनंती.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com