सावधान ! क्यू आर कोड करतांनी सतर्कता बाळगा – पोलीस उपनिरीक्षक किशोर मोतींगे

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी दि. 15 :- आजच्या आधुनिक स्पर्धात्मक युगात सोशल मीडियाचा वापर योग्य कामासाठी न करता त्याचा गैरवापराने फसवणुकीचे प्रमाण वाढले आहे. तेव्हा सर्वसामान्य नागरिकांसह इतरांमध्ये सूध्दा सायबर गुन्ह्याबाबत जनजागृती व्हावी आणि नागरिकांनी आपली फसवणूक होऊ नये यासाठी कसे सतर्क राहावे यासाठी नागपूर शहर पोलीस आयुक्तालय च्या वतीने पोलीस विभागातूनच पोलीस काका ची निवड करण्यात आली आहे. हे पोलीस काका शहरातील चौका चौकासह इतर वर्दळीच्या ठिकानातील नागरिकांना सायबर गुन्ह्याविषयी सतर्क राहण्याचा मूलमंत्र देत जनजागृती करीत आहेत त्यानुसार काल पोलीस उपनिरीक्षक किशोर मोतींगे यांनी कामठी बस स्टँड चौकातील नागरिकांना सायबर गुन्ह्याविषयी मौखिक मार्गदर्शन करीत फसवणुकीच्या प्रकारातुन कशी सावधानता बाळगावी याबाबत मार्गदर्शन केले.
कामठी पोलीस विभागाच्या वतीने नागरिकांना सायबर गुन्ह्यांबाबत माहिती व्हावी यासाठी सायबर गुन्हे जनजागृती अभियान हाती घेण्यात आले आहे. नवीन कामठी पोलीस स्टेशन विभागातील निवड झालेले पोलीस काका पोलीस उपनिरीक्षक किशोर मोतींगे हे पोलिस विभागाच्या वतीने नागरिकांनी मोबाईल, ट्विटर आणि फेसबुक या समाजमाध्यमांवर सायबर गुन्ह्यांपासून कसे वाचावे, फसवणूक झाल्यास पोलिसांशी कसा संपर्क साधावा तसेच सायबर गुन्ह्यांबाबत चौका चौकात मार्गदर्शन करून सायबर गुन्ह्याची जनजागृती करीत आहेत.
सध्या स्मार्टफोनच्या माध्यमातून आर्थिक व्यवहार करण्यात येतात अशा व्यवहारामुळे सायबर क्राईमही वाढले आहे. मात्र अनेक नागरिक फसवणुकीच्या या प्रकारापासून सतर्क नसल्याचे दिसून येत असल्याने  दिवसेंदिवस सायबर क्राईम चे गुन्हे वाढीस असून फसवणुकीचे प्रकार दिसून येतात. या फसवणुकीच्या प्रकारातून मोबाईलवर ‘ओटीपी’पाठवून खात्यातून परस्पर पैसे काढून घेण्याचेही प्रकार घडत आहेत.
हॅकर कडून अनोळखी क्रमांकावरून क्यूआर कोड पाठवला जात आहे. नागरिकांनी सतर्क राहावे आणि तात्काळ जवळच्या पोलीस स्टेशनला कळवावे असे आवाहन पोलीस विभागाच्या वतीने ‘पोलीस काका’पोलीस उपनिरीक्षक किशोर मोतींगे यांनी केले आहे.
बरेचदा क्यूआर कोड स्कॅन करताना आपल्या खात्यावर पैसे जमा होतील असे भासविणारे संदेश पाठविले जातात मग त्या क्यूआर कोडला वापरल्यास पैसे जमा होण्याऐवजी आपलेच पैसे खात्यातून गायब होतात , तसेच लॉटरी लागल्याचे संदेश पाठवून क्यूआर कोड मोबाईल वर पाठवला जातो यामध्ये रिवॉर्ड पॉईंट कॅश करण्यासाठी दिलेल्या कोड ला स्कॅन केल्यानंतर संबंधित रक्कम भरा असे सांगितले जाते. कॅशलेस व्यवहाराला मिळत असलेले प्राधान्य लक्षात घेऊन आपला मोबाईल थेट बँक खात्याला जोडलेला असतो. क्यूआर कोड स्कॅन केल्यास थेट रक्कमही गायब झाल्याचे प्रकार घडले आहेत तेव्हा नागरिकानो क्यूआर कोड स्कॅन करताना सतर्कता बाळगा असे आवाहन पोलीस उपनिरीक्षक किशोर मोतींगे यांनी केले आहे.
एक सर्वसामान्य नागरिकांचा आर्थिक व्यवहारांच्या बाबतीत ऑनलाइन व्यवहार पद्धतीकडे कल दिसून येतो. असे व्यवहार करताना अनेकांची फसवणूक झाल्याचे प्रकार देखील समोर आले आहेत. तसेच काही नागरिक जास्त पैसे मिळविण्याच्या किंवा कमविण्याच्या अमिषाला बळी पडतात आणि आपल्या बँक खात्याविषयीची सर्व गोपनीय माहितीची देवाणघेवाण करतात. याचाच फायदा घेत काही भामट्यांकडून नागरिकांची आर्थिक फसवणूक केली जाते. तसेच तरुण-तरुणी आपल्या खासगी आयुष्याची माहिती, छायाचित्रे समाजमाध्यमांवर टाकण्याच्या बाबतीत आहारी गेल्याचे दिसून येते. याच खासगी माहितीचा आणि छायाचित्रांचा गैरवापर करून त्यांच्याकडून काही समाजकंटक पैसे उकळतात. या प्रकारच्या गुन्ह्यांबाबत कुठे तक्रार करावी, सायबर गुन्हे शाखेशी कसा संपर्क साधावा तसेच सायबरक्राईम या संकेत स्थळाला भेट देणे याबाबत नागरिकांना माहिती व्हावी यासाठी हे सायबर गुन्हे जनजागृती अभियान राबविले जात आहे. आपली फसवणूक कशी होऊ शकते, मुलांच्या हातात मोबाइल दिल्यावर कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी, नोकरीबाबतचे खोटे संदेश ओळखणे, महिलांचे लैंगिक छळ करण्यासाठी गुन्हेगार कोणती प्रणाली वापरतात, ईमेल खाते आपल्याच संगणकावर सुरू करावे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
याप्रसंगी कामठी बस स्टँड चौकातील सलीम भाई, नुमान, राकेश कनोजिया, सजाक शेख, आशिष मेश्राम, नागसेन गजभिये,प्रमोद खोब्रागडे, सुनील चहांदे,सुनील बडोले, यासिन भाई,अविनाश भांगे,आसाराम हलमारे ,अजय करियार, नरेश फुलझेले, प्रमोद रंगारी,मुकेश कनोजिया आदी नागरिक गण उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

शिक्षकाकडून आदिवासी विद्यार्थ्यांला मारहाण प्रकरणात दोन शिक्षकांना अटक

Thu Sep 15 , 2022
अमरदिप बडगे, प्रतिनिधी गोंदियातील प्रसिद्ध प्रोग्रेसिव्ह इंटरनँशनल शाळेतील धक्कादायक प्रकार शाळा व्यवस्थापन ने शिक्षकांना केले निलंबित गोंदिया :- शारीरिक सरावादरम्यान सहाव्या वर्गात शिकणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांला शिक्षकाने बेशुद्ध होईपर्यंत दोन शिक्षकांनी काठी आणि पाईपने बेदम मारल्याची धक्कादायक घटना गोंदियातील प्रसिद्ध प्रोग्रेसिव्ह शाळेत घडली असुन याची तक्रार पालकांनी गोंदिया ग्रामीण पोलिसात केली, असून पोलिसांनी तेजेश्वर तुरकर व लालचंद पारधी या दोन्ही शिक्षका […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
Verified by MonsterInsights