अंबाडा (देशमुख) च्या सरपंच प्रमिला बारई यांचा नवनिर्वाचित सदस्यांसह भारतीय जनता पार्टीत प्रवेश

काटोल :- काटोल विधानसभा क्षेत्रातील नरखेड तालुक्यातील अंबाडा(देशमुख) येथील ग्राम पंचायत निवडणुकीत प्रमिला बापूराव बारई सरपंचपासाठी अविरोध निवडून आल्या असून  विजय गुंजाळ, नारायण सरियाम, अनिल ठाकरे, सोनु रेवतकर, कविता फुले, इंदु कुमरे, मंजु उईके सदस्यपदी निवडून आले आहेत.

देशाचे पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांच्या शेतकरी व सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी करत असलेल्या कार्याला प्रभावित होऊन  दिनांक 5 डिसेंबर 2022 रोजी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष तथा काटोल विधानसभा प्रमुख चरणसिंग ठाकूर यांचे निवास्थानी सरपंच प्रमिला बारई यांनी सदस्यांसह भाजपा प्रदेशाध्यक्ष   चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावानी प्रवेशाचे निवेदन भाजपा जिल्हा संघटन महामंत्री किशोर रेवतकर , विधानसभा प्रमुख  चरणसिंग ठाकूर,अनु.जाती. मोर्चा जिल्हा महामंत्री देविदास कठाने, यांना सुपूर्त करून पक्षप्रवेश केला याप्रसंगी सावरगाव जी प सदस्या पारबताबाई काळबांडे,निवडणूक प्रभारी स्वप्नील नागापूरे,माजी नगराध्यक्ष तानाजी थोटे, दिलीप तांदळे,डॉ चेतन बारई, कमलाकर ठाकरे, श्याम नेहारे, महेंद्र नासरे, वीरेंद्र नासरे, गजानन ठाकरे,रामभाऊ सर्याम,चंदू काळबांडे,आदी मान्यवर उपस्थित होते.

( ग्राम पंचायत अंबाडा (देशमुख) च्यां सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असून सरवोतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही चरणसिंग ठाकूर यांनी दिली.)

 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

आंबेडकरी विद्यार्थ्यातर्फे अभिवादन 

Thu Dec 8 , 2022
नागपूर:- नागपूर विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारधारा, बौद्ध अध्ययन व पाली पदव्युत्तर विभागातील आजी-माजी विद्यार्थ्यांनी बुद्धिस्ट स्टुडंट्स असोसिएशनच्या माध्यमाने आज संविधान चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी प्रामुख्याने असोसिएशनचे अध्यक्ष भिक्खु महेंद्र कौसल, सचिव उत्तम शेवडे, निवृत्त न्यायाधीश परशराम पाटील, नरेश मेश्राम, सिद्धार्थ फोपरे, शामराव हाडके, हिरालाल मेश्राम, एड अस्मिता तिडके, एड विलास राऊत, मोरेश्वर […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com