कन्हान :- कन्हान शहरातील नागपुर जबलपुर राष्ट्रीय महामार्गा वर न्यु हायवे स्टार ढाबा समोर खंडाळा (घटाटे) शिवारात फोर व्हीलर वाहन चालक नदीम अंसारी याचा वाहना वरुन नियंत्रण सुटल्याने वाहन रोडच्या बाजुला असलेल्या लोखंडी रेलिंग ला जाऊन जोरदार धडकल्याने झालेल्या अपघातात पती परवेज अंसारी आणि 12 वर्षीय मुलगी अफिफा अंसारी या दोघांचा मृत्यु होऊन वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे .
प्राप्त झालेल्या माहिती नुसार रविवार (दि.21 ) मई ला सकाळी 7 वाजताच्या दरम्यान नवी दिल्ली वरुन बैंगलोर ला जाण्यासाठी अमराह परवेज अंसारी वय 33 वर्ष रा.सिहारा ठाणा सिहोरा ता.दामपुर जि.बिजनेर , उत्तरप्रदेश हे आपल्या पती परवेज कुर्शीद अंसारी वय 36 आणि मुलगी अफिफा परवेज अंसारी वय 12 वर्ष यांचा सोबत मारुती ब्रिजा फोर व्हीलर वाहन क्रमांक केए 04 एन सी 0042 चा चालक माम भाऊ नदीम नईस अंसारी वय 28 वर्ष असे चार लोक जायला निघाले होते व नागपुरला थांबायचे होते . रविवार आणि सोमवार (दि.22 ) मई ला मध्यरात्री 1 वाजता च्या दरम्यान राष्ट्रीय हाईवे चारपदरी महामार्गा ने मनसर वरुन नागपुर ला जात असतांना बोर्डा टोल नाका ओलांडल्यानंतर काही अंतरावर फोर व्हीलर वाहन चालक नदीम अंसारी याने आपल्या ताब्यातील वाहन भरधाव वेगाने चालवुन चालकाचे वाहना वरुन नियंत्रण सुटल्याने वाहन रोडच्या बाजुला असलेल्या लोखंडी रेलिंग ला जाऊन जोरदार धडकल्याने फिर्यादी अमराह अंसारी यांचा डाव्या हाताला मार लागुन फ्रैक्चर झाल्याने बेशुद्ध पडली अमराह अंसारी यांना होश आल्यानंतर कळले कि परवेज अंसारी आणि मुलगी अफिफा अंसारी यांचा अपघातात घटनास्थळी मृत्यु झाला . सदर घटनेची माहिती कन्हान पोलीसांना मिळताच पोलीस हवालदार गुरुप्रकाश मेश्राम हे आपल्या स्टाॅप सह घटनास्थळी पोहचले व घटनास्थळाचा पंचनामा करुन मृतदेह आपल्या ताब्यात घेऊन शवविच्छेदना करिता कामठी उपजिल्हा रुग्णालय येथे नेण्यात आले व जख्मी अमराह अंसारी यांचा डाव्या हाताला मार लागुन फ्रैक्चर झाल्याने त्यांना पुढील उपचारा करिता निरामय रुग्णालय नागपूर येथे भर्ती करण्यात आले .
सदर प्रकरणा बाबत कन्हान पोलीसांनी फिर्यादी अमराह अंसारी यांचा तक्रारी वरून पोस्टे ला आरोपी नदीम अंसारी याचा विरुद्ध अप क्रमांक 302 कलम 304(अ) , 279 , 338 , सहकलम 184 मोटार वाहन कायदा अन्वये गुन्हा दाखल करून आरोपी ला अटक करण्यात आली असुन गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद मकेश्वर यांचा मार्गदर्शनात पोलीस हवालदार गुरुप्रकाश मेश्राम हे करीत आहे