QR कोड स्कॅन करून मिळवा उद्यानाची माहिती अन् नोंदवा अभिप्राय

– मनपाच्या २६ उद्यानात “क्यू आर कोड बेस गार्डन फीडबॅक अँड कंप्लेंट रिड्रेसल सिस्टीम” सुरु होणार

नागपूर :- सर्वत्र वाढते शहरीकरण आणि गगनचुंबी इमारतींच्या मध्ये मानवाला थेट निसर्गाशी जोडण्याचे एक सुंदर माध्यम म्हणजे उद्यान, सुदृढ आरोग्य, शुद्ध हवा आणि निसर्गाचा स्पर्श अनुभवता येणाऱ्या उद्यानात विविध रंगीबेरंगी फुले, हिरवळ आणि पक्षांचा किलबिलाट मनाला आनंद देतो. आपण ज्या उद्यानात बसून निसर्गाशी हितगुज साधत आहोत, त्याच उद्यानाची माहिती आणि उद्यान विकासासंदर्भात अभिप्राय आता एक क्यू आर कोड स्कॅन करून थेट महानगरपालिकेच्या उद्यान विभागात नोंदविता येणार आहे.

शहरातील उद्यानांची माहिती मिळावी व उद्यानासादर्भात तक्रार थेट मनपाच्या उद्यान विभागाकडे पोहोचविता यावी, या उद्देशाने नागपूर महानगरपालिकेने मोठे पाऊल उचलले आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या प्रेरणेने मनपा क्षेत्रातील उद्यानांमध्ये “क्यू आर कोड बेस गार्डन फीडबॅक अँड कंप्लेंट रीड्रेसल सिस्टीम” ही प्रणाली विकसित करण्यात आली आहे. त्यानुसार मनपा क्षेत्रातील 26 उद्यानांमध्ये ही प्रणाली प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात येणार आहे.

मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी गुरुवारी (ता.२६) धंतोलीतील मेजर सुरेंद्र देव उद्यानात (धंतोली गार्डन) प्रायोगिक तत्वावर लावण्यात आलेल्या “क्यू आर कोड बेस गार्डन फीडबॅक अँड कंप्लेंट रिड्रेसल सिस्टीम”चे निरीक्षण केले. याप्रसंगी उद्यान अधीक्षक अमोल चौरपगार, आयटी विभागाचे स्वप्निल लोखंडे यांच्यासह धंतोली नागरिक मंडळाचे प्रदीप कोकास, माजी नगरसेवक बबलू देवतळे, लखन येरवार आदी सदस्य उपस्थित होते.

आयटी विभागाचे स्वप्निल लोखंडे यांनी मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांना संपूर्ण प्रणालीचे कार्य प्रात्यक्षिकाद्वारे समजावून सांगितले. या अभिनव उपक्रमांतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या २६ उद्यानांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर प्रवेश द्वार, उद्यानातील बसण्याचे ठिकाण, मुलांचे क्रीडांगण, बाहेर जाण्याचा मार्ग अशा जवळपास चार ते पाच दर्शनीय जागेवर “क्यू आर कोड” लावण्यात येणार आहेत. हा कोड मोबाईलवर स्कॅनकरून नागरिक उद्यानाची माहिती, त्यासंदर्भाती तक्रारी, विकासासाठीचे अभिप्राय थेट मनपाच्या उद्यान विभाग, आयटी विभाग, उद्यानातील संबंधित कंत्राटदार यांच्या पर्यंत पोहोचवू शकतो. नागरिकांकडून मिळणारा प्रतिसाद, सूचना, अभिप्राय लक्षात घेवून मनपा हद्दीतील सर्व उद्यानांमध्ये अशाप्रकारे क्यू आर कोड लावण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी मार्गदर्शनात मनपाची उद्याने अधिक नागरिक स्नेही करण्याचा प्रयत्न उद्यान विभागाद्वारे केला जात असल्याचे उद्यान अधीक्षक अमोल चौरपगार यांनी सांगितले. 

“क्यू आर कोड बेस गार्डन फीडबॅक अँड कंप्लेंट रीड्रेसल सिस्टीम असे करेल काय..

मनापाद्वारे नागरिकांच्या सोयीसाठी “क्यू आर कोड बेस गार्डन फीडबॅक अँड कंप्लेंट रीड्रेसल सिस्टीम ही प्रणाली प्रायोगिक तत्वावर मनपा क्षेत्रातील २६ उद्यानात लावण्यात येणार आहे. याद्वारे नागरिक मोबाईलवर क्यू आर कोड स्कॅन करून उद्यानाचे परिसर, उद्यानात असणारे विविध वृक्ष, फूल, उद्यानात दिल्या जाणाऱ्या सोयी सुविधा, प्रसाधनगृह आदी विषयी माहिती मिळवू शकतात, तसेच उद्यानासंदर्भातील तक्रार देखील करू शकतात. नागरिकांनी केलेली तक्रार एसएमएसद्वारे तक्रारकर्ता, उद्यान विभाग आणि संबंधित कंत्राटदार यांच्या पर्यत पोहोचेल व समस्याचे निराकरण त्वरित करता येईल.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

पंतप्रधानांविषयी बेताल वक्तव्ये करणा-या राहुल गांधींना मतदार धडा शिकवतील -भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांचा इशारा

Fri Apr 26 , 2024
मुंबई :- सोलापूरच्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एकेरी व अवमानकारक उल्लेख करून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी त्यांची संस्कृती दाखवून दिली आहे. त्यांनी केवळ नरेंद्र मोदी यांचा नव्हे, तर देशाच्या सर्वोच्च सांविधानिक पदावरील व्यक्तीचा अपमान केला असून पराभवाच्या भीतीने वैफल्य आल्यामुळे त्यांचा जिभेवरील ताबा सुटल्याचे स्पष्ट झाले आहे. येत्या लोकसभा निवडणुकीत अशा असभ्य व उर्मट नेत्यांना व त्यांच्या पक्षाला […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com