सच्चिदानगर व लाडेकर लेआउट या जोडावरील नागरिकांना मच्छरांचा भयंकर त्रास ? पुलाचे अर्धवट काम ठप्प, मनपाच दोषी ! नागरिकांचा आरोप 

– सच्चिदानंद नगरातील पुलाचे सिमेंट नाल्याचे बांधकाम अधुरे !

– नाल्या नजिकच्या नागरिकांना मच्छरांचा भयंकर त्रास 

नागपूर :- दक्षिण नागपूर येथील मानेवाडा रिंग रोडवरील सचिदानंद नगरातील व लाडेकर ले -आउट यांच्या जोडावर असलेल्या पुलाच्या नाल्याचे बांधकाम काही ठिकाणी होऊन, काही काम अचानक थांबविल्या गेलेले आहे. सच्चिदानंद नगर व लाडीकर ले आउटच्या जोडावरील लोकांची कोंडी होत पुलाचे बांधकाम ठप्पच आहेत. येण्याऱ्या -जाणाऱ्यां नागरिकांची गैरसोय होत आहे. तसेच या नाल्यांमधील पूर्वीपासून साचलेले घाण पाण्याचा खूपचं दुर्गंध परसत आहे. त्यात किडे, माकोडे, कचरा, काडी पडलेला आहे. घाण पाण्याचा दुर्गंध सुद्धा येतोय आणि वरून पावसाने थैमान घातले असून वादळी पावसामुळे पाणी पुन्हा त्याच्यात साचलेले आहेत आणि त्या पाण्याची खूपच दुर्गंधी पसरलेली असून तेथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

अर्धवट नाल्याच्या बांधकामापासून नागरिकांना मच्छरांचा खूपच त्रास होत आहे. अनेक नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम झाला आहे. याकडे मनपा प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. दुसरी गोष्ट नाल्याला कठाळे लावून रस्ता बंद करून सावधान काम चालू आहे ? असे बोर्ड लावले ! याचा अर्थ काय ? कित्येक दिवसापासून काम ठप्प पडले असून अधुरंच काम केले आहे. या पुलाच्या बांधकामामुळे वस्तीतील नागरिकांनी मनपालाच दोषी ठरविले आहे.

नाल्याचे पूर्णपणे बांधकाम तातडीने करावे. अशी नम्र विनंती तेथील नागरिकांनी केली आहे. अन्यथा सच्चिदानगर व लाडेकर ले -आउट येथील रहिवाशांनी मनपाच्या विरोधात आंदोलनाचा इशारा दिलेला आहे. कारण मागील दोन वर्षांपासून प्रभागात नगरसेवक नाहीत तर आमच्या लोकांचं कोण ऐकणार ? हा प्रश्न लोकांसमोर पडलेला आहे ? तरी सुद्धा मनपाचे राज्य असून मनपा निष्काळजीपणा करित आहे. असा चक्क आरोप नागरिकांनी लावला आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

सुगंधित तंबाखु विक्री करणाऱ्या आरोपीस मुद्देमाला सह पकडले 

Sat Apr 27 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  – अन्न सुरक्षा अधिकारी आणि कन्हान पोलीस डी. बी पथक यांची संयुक्त कार्यवाही.  कन्हान :- पोलीस स्टेशन अंतर्गत कांद्री वार्ड नं. ४ येथे हिना अँक्वा जवळ सुगंधित तंबाखु विक्री करणा ऱ्याला अन्न सुरक्षा अधिकारी, अन्न व औषध प्रशासन आणि कन्हान पोलीस डी.बी पथकांनी पकडुन त्याचे जवळुन १७,३५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन पोस्टे ला गुन्हा दाखल करण्यात […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com